vaishakh purnima upay in marathi : हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला व या दिवशी केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्याला खूप महत्त्व असतं. या दिवशी पूजा आणि उपवास केल्यानं सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं. जीवनात सुख, समृद्धी येते.
द्रीक पंचांग नुसार वैशाख महिन्याची पौर्णिमा २३ मे २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे. या विशेष दिवशी दानधर्म आणि धार्मिक कार्य शुभ मानले जातात. वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्यानं इच्छित फळ मिळतं, असं म्हटलं जातं. या दिवशी सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी अनेक विशेष उपाय केले जातात. चला जाणून घेऊया वैशाख पौर्णिमेचे शुभ मुहूर्त आणि खास उपाय...
द्रीक पंचांगानुसार, वैशाख महिन्याची पौर्णिमा २२ मे २०२४ रोजी सायंकाळी ७.४७ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी सायंकाळी ७.२२ वाजता समाप्त होईल. त्यामुळं उदय तिथीनुसार २३ मे रोजी वैशाख पौर्णिमा साजरी होणार आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे ४.०४ वाजता आहे.
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी…
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर कायम राहतो, असं मानलं जातं.
प्रगतीसाठी…
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असं केल्यानं कामातील अडथळे दूर होतात आणि व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते, असं मानतात.
शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी…
वैशाख पौर्णिमेचा दिवस शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शुभ मानला जातो. या दिवशी शनिदेव आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते.
भगवान विष्णूची पूजा
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची यथासांग पूजा करावी. असं केल्यानं घरात सुख, समृद्धी आणि समृद्धी येते असं म्हणतात.
धनप्राप्तीचे मार्ग
या दिवशी पूजा करताना लक्ष्मीच्या चरणी ११ पिवळे शिंपले अर्पण करा. यानंतर ते लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. असं केल्यामुळं पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते, असं मानतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)
संबंधित बातम्या