Utpatti Ekadashi 2022 : उत्पत्ती एकादशीचे शुभ मुहूर्त कोणते?, कशी करावी पूजा?
Utpatti Ekadashi Tithi & Shubh Muhurta : एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते. जाणून घ्या उत्पत्ती एकादशी कधी आहे
हिंदू कॅलेंडरनुसार, मार्गर्शिष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला उत्पत्ती एकादशी म्हणतात. दर महिन्याला दोन एकादशी असल्या तरी उत्पत्ती एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. यावर्षी उत्पत्ती एकादशी व्रत २० नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
उत्पत्ती एकादशी २०२२ शुभ मुहूर्त
एकादशी तिथी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून २९ मिनिटांनी सुरू होईल, ती २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून ४१ मिनिटांनी समाप्त होईल.
उत्पत्ती एकादशीच्या व्रताचे शुभ मुहूर्त
उत्पत्ती एकादशी व्रताचे पारायण २१ नोव्हेंबर २०२२ रोजी केले जाईल.पारायण व्रताचा शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून ४८ मिनिटं ते ८ वाजून ५६ मिनिटांपर्यंत आहे.पारणतिथीच्या दिवशी द्वादशी तिथी समाप्त होण्याची वेळ सकाळी १० वाजून ०७ मिनिटांनी आहे.
उत्पत्ती एकादशीच्या दिवशी काय करावं
सकाळी लवकर उठणे आणि स्नान वगैरे आटोपून घेणे.
घरातील मंदिरात दिवा लावावा.
भगवान विष्णूचा गंगाजलाने अभिषेक.
भगवान विष्णूला फुले आणि तुळशीची डाळ अर्पण करा.
शक्य असल्यास या दिवशीही व्रत ठेवावे.
परमेश्वराची उपासना करा.
देवाला नैवेद्य दाखवावा.परमेश्वराला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे ध्यानात ठेवा.भगवान विष्णूच्या प्रसादामध्ये तुळशीचा समावेश करावा.- तुळशीशिवाय भगवान विष्णू प्रसन्न होत नाहीत, असे मानले जाते.
या पवित्र दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा.
या दिवशी भगवान विष्णूचे जास्तीत जास्त ध्यान करावे.
संबंधित बातम्या