उत्पत्ति एकादशी २०२४ : नोव्हेंबर महिन्यात येणारी शेवटची एकादशी उत्पत्ति एकादशी म्हणून ओळखली जाईल. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला उत्पत्ति एकादशी साजरी केली जाईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार उत्पत्ति एकादशी २६ नोव्हेंबर ला येते. या दिवशी भगवान विष्णूची पूर्ण विधीने पूजा केली जाईल. श्री हरीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास आणि महत्वाचा मानला जातो. मान्यतेनुसार उत्पत्ति एकादशीचे व्रत केल्यास जातकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. जाणून घेऊया उत्पत्ति एकादशीची नेमकी तिथी, शुभमुहूर्त, पूजाविधी आणि साहित्य-
यावर्षी उत्पत्ति एकादशी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे. उदय तिथीनुसार २६ नोव्हेंबर रोजी उत्पत्ति एकादशीचे व्रत करता येते.
एकादशी तिथी प्रारंभ - २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०१ वाजून ०१ मिनिटे.
एकादशी तिथी समाप्ती - २७ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ०३ वाजून ४७ मिनिटे.
पारण वेळ - दुपारी १ वाजून १२ मिनिटे ते ०३ वाजून १८ मिनिटापर्यंत.
तिथी हरिवसर समाप्तीची वेळ - सकाळी १० वाजून २६ मिनिटे.
एकादशी ही एक देवी असून, तिचा अवतार भगवान श्री विष्णूंमुळे झाला होता. एकादशी देवी कार्तिक वद्य एकादशी दिवशी प्रकट झाली होती. यामुळे कार्तिक वद्य एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले. या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरु झाले, असे सांगितले जाते.
रक्षासूत्र, चंदन, अक्षत, फळे, फुलांच्या माळा, अगरबत्ती, गंगाजल, तूप, तुळशीची पाने, पंचामृत व सौभाग्याच्या वस्तू, प्रसाद इ.
सकाळी लवकर उठून स्नान करा. यानंतर देवघराची स्वच्छता करून देवपूजा करा. भगवान श्री हरि विष्णूंचा गंगाजलाने जलाभिषेक करा. देवाला पिवळे चंदन आणि पिवळी फुले अर्पण करा, मंदिरात तुपाचा दिवा लावा. शक्य असल्यास उपवास ठेवा आणि उपवास करण्याचा संकल्प करा. उत्पत्ति एकादशीच्या व्रतकथेचे पठण करा.
ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. भगवान श्री हरी विष्णू आणि लक्ष्मी यांची पूर्ण भक्तीभावाने आरती करा. नैवेद्यात तुळशीचे पान ठेऊन भगवंताला अर्पण करा आणि शेवटी क्षमा प्रार्थना करा.
संबंधित बातम्या