Utpatti Ekadashi 2024 Shubhechha In Marathi : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भगवान विष्णूच्या दर्शनासाठी उत्पत्ति एकादशी व्रत पाळले जाते. २६ नोव्हेंबर रोजी अर्धरात्रौ १ वाजता एकादशी तिथी सुरू होत असून, २७ नोव्हेंबर रोजी अर्धरात्रौ ३:४७ वाजता संपेल. त्यामुळे २६ नोव्हेंबर रोजी उत्पत्ति एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे.
शास्त्रानुसार जो व्यक्ती उत्पत्ति एकादशीचा उपवास करतो, तो वैकुंठ धामला जातो अशी मान्यता आहे. एकादशी महात्म्याचे पठण करणार्याला हजारो गोदानांचे पुण्य प्राप्त होते. हे व्रत केल्याने धर्म आणि मोक्ष प्राप्त होतो.
उत्पत्ति एकादशीला उत्पन्ना एकादशी असेही म्हणतात. उत्पन्ना एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी देवाची पूजा फुल, धूप, दीप, चंदन, अक्षत, फळे, तुळस इत्यादींनी करावी. या दिवशी 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' चा जप करणे आणि विष्णु सहस्त्रनामाचे पठण करणे शुभ मानले जाते.
उत्पत्ति एकादशीच्या व्रतामुळे मिळणारे फळ हे अश्वमेध यज्ञ, कठोर तपश्चर्या, तीर्थक्षेत्रातील स्नान इत्यादींमुळे मिळणाऱ्या फळांपेक्षा अधिक असते, असे मानले जाते. या एकादशीनिमित्त आपल्या प्रियजणांना द्या मंगलमय शुभेच्छा संदेश. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.
काया ही पंढरी
आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवल पांडुरंग
जय जय हरी विठ्ठल
आळंदी यात्रा आणि कार्तिक एकादशीच्या शुभेच्छा
…
लक्ष्मी वल्लभा…
दीनानाथा पद्मनाभा…
सुख वसे तुझे पायीं,
मज ठेवी तेचि पायी
उत्पत्ति एकादशीच्या शुभेच्छा
…
हरि मनीं हरि चित्तीं हरि अंकु शरीरीं ।
तयातें देखोनि हरि चार्ही बाह्या पसरीं
उत्पत्ति एकादशीच्या शुभेच्छा
…
पाणी घालतो तुळशीला
वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या प्रियजणांना
हिच प्रार्थना पांडुरंगाला
सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा!
…
भगवान विष्णू तुम्हाला योग्य गोष्टी करण्याची
आणि तुमची सर्व वाईट कर्मे
तुमच्या चांगल्या कर्माने दूर करण्याची शक्ती देवोत...
उत्पन्न एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
…
उत्पन्ना एकादशीच्या काळात
तुम्हाला शाश्वत आनंद आणि शांती,
सौहार्द आणि समाधान लाभो हीच शुभेच्छा
उत्पत्ति एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा
…
विठ्ठल माझा ध्यास,
विठ्ठल माझा श्वास,
विठ्ठल माझा भास,
विठ्ठल माझा आभास,
उत्पत्ति एकादशी आणि आळंदी यात्राच्या शुभेच्छा
…
तुमच्या कुटुंबाला आनंद, सौहार्द
आणि भरभराट लाभो याच सदिच्छा
उत्पत्ति एकादशीनिमित्त खूप खूप शुभेच्छा…