Utpatti Ekadashi 2024 Remedy In Marathi : उत्पत्ती एकादशी व्रत दरवर्षी १ वेळा केले जाते. हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी उत्पत्ती एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूचे भक्त उपवास करतात आणि विधीपूर्वक पूजा करतात. एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या व्रताच्या दिवशी काही गोष्टी केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. चला जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करणे फलदायक आहे.
यावर्षी उत्पत्ति एकादशी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे. एकादशी तिथी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०१:०१ वाजता सुरू होईल आणि २७ नोव्हेंबर रोजी पहाटे 0३:४७ वाजता एकादशीची समाप्ती होईल . उदया तिथीनुसार २६ नोव्हेंबर रोजी उत्पत्ति एकादशीचे व्रत करता येते.
उत्पत्ति एकादशीच्या दिवशी भगवान नारायणासमोर दिवा लावा आणि फुलं अर्पण करा. तसेच ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा.
उत्पत्ति एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करून दिवा लावावा. तसेच तुळशी मातेला फुले व मिठाई अर्पण करा.
उत्पत्ति एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्न, कपडे किंवा पैसे दान करा. यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.
उत्पत्ति एकादशीच्या दिवशी शालिग्रामला गंगाजलाने स्नान करावे. तसेच संध्याकाळी पिवळे वस्त्र अर्पण करून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी.
उत्पत्ति एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद मिसळून आंघोळ करावी. तसेच या दिवशी पिवळे कपडे घालावेत. यामुळे विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो.
उत्पत्ति एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना केशर दुधाचा अभिषेक करावा. या उपायाने जीवनातील सर्व त्रास दूर होऊ लागतात.
उत्पत्ति एकादशीच्या दिवशी केशर, हळद किंवा चंदनाने भगवान विष्णूला टिळक लावा. तसेच पिवळी फुले अर्पण करा. यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात.
उत्पत्ति एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा. या उपायाने लवकर कर्जमुक्ती मिळते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे, हे पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)