आज सोमवार १२ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याच्या दुसरा सोमवारचा उपवास केला जात आहे. श्रावणाच्या सोमवारी अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत. श्रावणाचा हा दुसरा सोमवार दोन शुभ योगात येत आहे. त्याचवेळी लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे सकाळपासूनच राहुकाळ आणि भद्राची सावली पडते आहे. अशा स्थितीत पूजा पाठ करण्याची योग्य वेळ कधी आहे, याबाबत शिवभक्तांमध्ये संभ्रम आहे. या दुसऱ्या श्रावणी सोमवारी भद्राची सावली सुमारे १३ तास राहणार आहे. अशा वेळी जाणून घेऊया भगवान शंकराची उपासना करण्यासाठी उत्तम मुहूर्त आणि भद्रासाठीचे उपाय -
पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी सकाळी ७.२८ पासून राहुकाळ सुरू होत आहे, जो सकाळी ९.०७ वाजता समाप्त होईल. त्याच वेळी, या दिवशी भद्रा सकाळी ७ वाजून ५५ मिनिटे ते रात्री ८ वाजून ४८ मिनिटापर्यंत असेल. पहाटे ४.२५ पासून ब्रह्म मुहूर्ताला सुरुवात होईल. अशा परिस्थितीत शिवभक्तांसाठी संध्याकाळी ७:२८ च्या आधी पूजा करणे उत्तम ठरू शकते.
श्रावण महिन्यात दर सोमवारी भगवान शंकराला शिवमूठ वाहली जाते, दुसऱ्या श्रावण सोमवारी भगवान शंकराला तिळाची शिवामूठ वाहीली जाते.
तिसरा सोमवार – १९ ऑगस्ट, तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग वाहावी.
चौथा सोमवार – २६ ऑगस्ट, चौथ्या सोमवारी शिवामूठ जव वाहावी.
पाचवा सोमवार – २ सप्टेंबर, पाचव्या सोमवारी शिवामूठ सातू वाहावी.
भद्राकाळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. भद्राच्या वेळी लग्न, सणांची मुख्य पूजा, नवीन व्यवसाय, मुंडन संस्कार, ग्रहप्रवेश आदी शुभ कार्ये वर्ज्य मानली जातात. तसेही चातुर्मास सुरू असल्यामुळे सर्व शुभ कार्य बंदच आहे.
भद्राच्या १२ नावांचा जप केल्यास भद्रा, धन, व्यष्टी, दधिमुखी, कालरात्री, महामारी, खराण्णा, भैरवी, असुरक्षयकारी, महाकाली, महारुद्र आणि कुलपुत्रिका यांचा जप केल्यास भद्राचे वाईट प्रभाव कमी होतात.
मान्यतेनुसार, जेव्हा चंद्र कर्क, सिंह, कुंभ किंवा मीन राशीत असतो, तेव्हा भद्रा पृथ्वीवर निवास करते असे मानले जाते. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी, चंद्र देव तूळ राशीत निवास करेल. अशा स्थितीत भद्राचे वास्तव्य पाताळामध्ये असेल. ती राहत असलेल्या जगावर भद्राचा प्रभाव पडतो असे म्हणतात.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.