Tulsidas Jayanti : तुलसीदास जयंतीच्या शुभेच्छांसह जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी-tulsidas jayanti 2024 date tithi important special things related to his life and wishes quotes messages ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Tulsidas Jayanti : तुलसीदास जयंतीच्या शुभेच्छांसह जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी

Tulsidas Jayanti : तुलसीदास जयंतीच्या शुभेच्छांसह जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी

Aug 11, 2024 10:52 AM IST

Tulsidas Jayanti 2024 :दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला तुलसीदास यांची जयंती साजरी केली जाते. तुलसीदास यांचा जन्म १६व्या शतकात झाला. आज ११ ऑगस्ट रोजी तुलसीदास जयंती असून, जाणून घ्या त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी आणि जयंतीनिमित्त शुभेच्छा द्या.

तुलसीदास जयंती २०२४ शुभेच्छा
तुलसीदास जयंती २०२४ शुभेच्छा

Tulsidas Jayanti 2024 :दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला तुलसीदास यांची जयंती साजरी केली जाते. तुलसीदास यांचा जन्म १६व्या शतकात झाला असल्याचे सांगितले जाते. यंदा तुलसीदास यांची जयंती ११ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. तुलसीदासांनी अनेक ग्रंथ रचले. श्री रामचरितमानस रचून गोस्वामी तुलसीदास कायमचे अमर झाले. जाणून घेऊया तुलसीदास यांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी.

रामचरितमानस’ या प्रसिद्ध महाकाव्याचे नाव ऐकल्यावर प्रत्येकाच्या मनात सर्वप्रथम गोस्वामी तुलसीदासांचे नाव येते. रामचरित मानस हा धार्मिक ग्रंथ आहे. ज्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे वर्णन केले आहे. तुलसीदासांनी हा ग्रंथ लिहिला. ते एक महान हिंदी कवी आणि संत होते. प्रभू रामाचे जीवन, आदर्श आणि धार्मिक शिकवणी त्यांनी आपल्या कार्यातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या कार्यांचा भारतीय साहित्य आणि धर्मावर खोलवर परिणाम झाला आहे.

हनुमानास गुरु मानले

श्री राम भक्त हनुमान यांना तुलसीदासांचे आध्यात्मिक गुरू म्हटले जाते. तुलसी दास यांनी हनुमानाच्या पूजेसाठी विविध रचनाही लिहिल्या आहेत. त्यामध्ये हनुमान चालीसा आणि बजरंग बाण इत्यादी प्रमुख आहेत. गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमानास आपले गुरू मानले. गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा रचली होती. धार्मिक मान्यतेनुसार हनुमान चालिसाचे पठण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

बालपण संकटांनी भरलेले होते

गोस्वामी तुलसीदास यांचे बालपण संकटांनी भरलेले होते. तुलसीदासांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलांनी त्यांचा त्याग केला.

बायकोच्या कडवट बोलण्याने आयुष्य बदलले

तुलसीदासांना त्यांची पत्नी रत्नावली हि खूप प्रिय होती. एकदा तुलसीदास आपल्या पत्नीला भेटण्यासाठी नदी ओलांडून गेले. तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना उपदेश केला आणि म्हणाली की, तुम्ही माझ्यावर इतके प्रेम करतात हेच इतके प्रेम प्रभू रामावर केले असते तर मोक्ष प्राप्त झाला असता. हे ऐकून तुलसीदासांचे चैतन्य जागृत झाले आणि त्या क्षणापासून त्यांनी रामाची आराधना सुरू केली.

शेवटचा काळ काशीत घालवला

तुलसीदासांनी आपले शेवटचे दिवस काशीमध्ये घालवले आणि तिथेच त्यांनी श्रीरामाच्या नावाचे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग केला.

गोस्वामी तुलसीदास यांनी १२ ग्रंथ रचले-

श्री रामचरितमानस या महान ग्रंथाचे लेखक गोस्वामी तुलसीदास यांनी एकूण १२ ग्रंथांची रचना केली. त्यांनी लिहिलेल्या श्री रामचरितमानसला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. श्री रामचरितमानस नंतर हनुमान चालिसा ही त्यांची लोकप्रिय रचना आहे. गोस्वामी तुलसीदासांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये श्री रामचरितमानस, कवितावली, जानकीमंगल, विनयपत्रिका, गीतावली, हनुमान चालीसा, बरवाई रामायण इत्यादी प्रमुख आहेत.

गोस्वामी तुलसीदास यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा

रामचरितमानस ग्रंथाचे रचयीता

हनुमानाचे भक्त गोस्वामी तुलसीदास

यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

लोककवी तुलसीदास यांना जयंतीनिमित्त शतशः प्रणाम

तुळशीच्या शब्दात रामाचा महिमा वास आहे.

त्यांच्या कलाकृतीत भक्तीचे वैशिष्ट्य दडलेले आहे.

रामचरितमानसाच्या प्रतिध्वनीने जग उजळून निघाले.

प्रेमाचे अमृत तुलसीदासांच्या बोलण्यात आहे.

तुलसीदास यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा

विभाग