Tulsi Vivah Puja: तुळशी विवाहाच्या पूजेत चुकूनही या गोष्टींचा वापर करू नका, जाणून घ्या महत्त्व!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Tulsi Vivah Puja: तुळशी विवाहाच्या पूजेत चुकूनही या गोष्टींचा वापर करू नका, जाणून घ्या महत्त्व!

Tulsi Vivah Puja: तुळशी विवाहाच्या पूजेत चुकूनही या गोष्टींचा वापर करू नका, जाणून घ्या महत्त्व!

Nov 12, 2024 10:16 AM IST

Tulsi Vivah Puja: तुळशीपूजनाचा सण केवळ भारतातच नव्हे तर जगभरात श्रद्धेने साजरा केला जातो. असे मानले जाते की जो कोणी तुळशीचा विवाह भगवान श्री हरि विष्णूशी श्रद्धेने करतो, त्याच्या पूर्वजन्मातील सर्व पापे नष्ट होतात.

तुळशी विवाहाच्या पूजेत चुकूनही या गोष्टीचा वापर करू नका!
तुळशी विवाहाच्या पूजेत चुकूनही या गोष्टीचा वापर करू नका!

Tulsi Vivah puja: आज देवउठनी एकादशी आहे. या दिवशी संध्याकाळी देवांना उठवले जाते. याशिवाय तुळशीविवाहही या दिवशी केला जातो. कार्तिक महिन्याच्या एकादशीपासून कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. हा विवाह विधिवत केला जातो. तुळशीविवाहात तुळशीचे रोप आणि शालिग्रामची गरज असते. तुळशीपूजनाचा सण केवळ भारतातच नव्हे तर जगभरात श्रद्धेने साजरा केला जातो. असे मानले जाते की जो कोणी तुळशीचा विवाह भगवान श्री हरि विष्णूशी श्रद्धेने करतो. त्याच्या पूर्वजन्मातील सर्व पापांचा नाश होतो. त्यामुळे कार्तिक महिन्यात ठिकठिकाणी विधिपूर्वक वाजत गाजत मंडप सजवून मंगलाचाराने हा विवाह पार पाडला जातो. ज्या जोडप्यांना मुले नसतात, विशेषतः मुलगी मूल नसते, अशा व्यक्ती आपल्या जीवनात एकदा तुळशी विवाह करून कन्यादान करता येणे आणि या कृत्याने कन्यादानाचे परमपुण्य प्राप्त करून घेता येते. जाणून घेऊया, तुळशी विवाह करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी

तुळशी विवाह करताना कोणती काळजी घेतली पाहिजे?

तुळशी विवाह करताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुळशी विवाहाचे हे नियम न पाळणे अशुभ मानले जाते. 

एकादशी तिथीला भात खाऊ नये, तांदळाचा उपयोग करू नये

तुळशी विवाहाची पूजा करताना हे लक्षात ठेवावे की एकादशी तिथीला भात खाऊ नये. हा आहे एकादशी व्रताचा सर्वात मोठा नियम, पण तुळशी विवाहात पूजेच्या वेळीही कच्च्या तांदळाचा वापर करू नका. पूजेमध्ये जिथे अक्षतांचा वापर करायचा आहे, तिथे तिळाचा वापर करू शकता.

तुळशीला जल अर्पण करू नका, तुळशीची पाने तोडू नका

या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नका किंवा तुळशीची पाने तोडू नका. त्यामुळे पंचामृतातही तुळशीची पाने घातली जात नाही. तुळशीला पाणी अर्पण केले जात नाही.

तुळस व शाळीग्रामसाठी कपडे नक्की आणा

या दिवशी माता तुळशी आणि शालिग्रामची युतीदेखील केली जाते. त्यामुळे शालिग्राम आणि तुळशीसाठी कपडे नक्की आणा. यानंतर दोघेही जयमालाचे घालून कपडे परिधान करून फेऱ्याही घेतात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner