कार्तिक महिना जगाचे स्वामी श्रीहरी विष्णू आणि माता तुळशीची पूजा करण्यासाठी शुभ मानला जातो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला म्हणजेच देवउठनी एकादशीला तर काही ठिकाणी द्वादशी तिथीला तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. यावर्षी देवउठनी एकादशी १२ नोव्हेंबर आणि तुळशी विवाह १३ नोव्हेंबर रोजी साजरा केला जात आहे.
तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेचा भव्य शृंगार केला जातो आणि तिचा विवाह भगवान शालिग्रामशी होतो. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाहामुळे जीवनात सुख-समृद्धी नांदते आणि भक्तांवर विष्णू आणि माता तुळशीची कृपा राहते. तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना, प्रियजणांना आणि कुटुंबियांना विशेष संदेशांद्वारे शुभेच्छा पाठवू शकता.
तुळशीचे पान
एक त्रैलोक्य समान,
उठोनिया प्रात: काली
करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
तुळशी विवाहाचा दिवस आला
सगळ्यांच्या मनी आनंद आला
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!
…
उत्सव मांगल्याचा, पावित्र्याचा
एक आनंददायी क्षण
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
…
ऊसाचे मांडव सजवूया आपण,
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सहभागी,
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
…
हिंदू धर्मात अतिशय पवित्र अशा मानणाऱ्या
तुळशी विवाहाच्या सोहळ्याला होतेय आजपासून सुरुवात
तुम्हा सर्वांना तुळसीविवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
तुळशी विवाह साजरा करा,
तुळशी माता आणि विष्णूचे ध्यान करा,
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
तुळशीविना घराला घरपण नाही
तुळशीविना अगंणाला शोभा नाही
जिच्या असण्याने मिळतो सर्वांना ऑक्सिजन
त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
…
ज्या अंगणात तुळस आहे,
तिथे देवी-देवतांचा वास आहे,
ज्या घरात ही तुळस आहे
ते घर स्वर्गासमान आहे,
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
…
चला वाटूया पेढे आणि गाऊया मंगलमयी मंगलाष्टके
कारण आज आहे आपल्या लाडक्या तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
तुळशीचे पान
एक त्रैलोक्य समान,
उठोनिया प्रात: काली
करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
…
वृन्दा वृदांवनी विश्वपूजिता विश्वपावनी||
पुष्पसारा नन्दनीच तुलसी कृष्ण जीवनी||
एतं भांमाष्टक चैव स्त्रोतम नामर्थ संयुक्तम
य: पाठेत तां चं सम्पूज सैश्रमेघ फललंमेता
तुळशी विवाहाच्या सगळ्यांना शुभेच्छा!