Tulsi Vivah : तुळशीच्या विवाहासाठी भटजी मिळत नाही! एका क्लिकवर वाचा लग्नाची मंगलाष्टके
मराठी बातम्या  /  धर्म  /  Tulsi Vivah : तुळशीच्या विवाहासाठी भटजी मिळत नाही! एका क्लिकवर वाचा लग्नाची मंगलाष्टके

Tulsi Vivah : तुळशीच्या विवाहासाठी भटजी मिळत नाही! एका क्लिकवर वाचा लग्नाची मंगलाष्टके

Nov 13, 2024 08:21 PM IST

Tulsi Vivah 2024 Mangalashtak : तुळशी विवाह सर्वीकडे प्रबोधिनी एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुरू राहील. तुळशी विवाहात महत्वाची असतात ती मंगलाष्टके, लग्नात मंगलाष्टके शिवाय लग्न पूर्ण होत नाही. तेव्हा वाचा संपूर्ण मंगलाष्टके मंत्रासहीत.

तुळशी विवाह मंगलाष्टके
तुळशी विवाह मंगलाष्टके

तुळशीविवाहाच्या तिथीचा उल्लेख वेगवेगळ्या धर्मग्रंथात वेगवेगळ्या प्रकारे केला आहे. पद्मपुराणात तुळशीविवाह कार्तिक शुक्ल नवमीला आणि देवीपुराणानुसार कार्तिक पौर्णिमेला सांगितला आहे. इतर ग्रंथांनुसार प्रबोधिनी ते पौर्णिमा हे पाच दिवस अधिक फल देतात.

देवप्रबोधिनी एकादशीनंतर सर्वत्र तुळशी विवाह आणि लग्नसराईची धामधूम पाहायला मिळते. तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. देशभरात देवउठनी एकादशीला तर महाराष्ट्रात आज १३ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह पार पडला असून, कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा केला जाईल.

आज देशभरात तुळशी विवाह साजरा करण्यात येत आहे. हा एक आनंदाचा क्षण आहे. तुळशी विवाहानंतर सर्व लग्नकार्य आणि शुभकार्य सुरू होतात. लग्नात मंगलाष्टके शिवाय लग्न पूर्ण होत नाही. तेव्हा वाचा संपूर्ण मंगलाष्टके मंत्रासहीत.

लग्नासाठी मंगलाष्टके

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।

बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं ||

लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |

ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मंगलम || १ ||

 

गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।

क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।

पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।

 

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।

गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।

अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।

रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।

 

राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।

ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।

आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।

रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।

 

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।

रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।

दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।

धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।

 

लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।

साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।

सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।

गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।

विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।

सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।

रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।

तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।

 

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।

गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।

दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी ।

वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

सर्व मंगलाष्टके म्हणून झाल्यावर पुढील मंत्राने विवाह सोहळा पूर्ण करावा

तदेव लग्नं सुदिनं तदेव

ताराबलं चंद्रबलं तदेव ।

विद्याबलं दैवबलं तदेव

लक्ष्मीपते तेङ्घ्रियुगं स्मरामि ॥

सुमुहूर्त शुभमंगल सावधान....

Whats_app_banner