Tulsi Vivah 2024: देवउठनी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवसाला देवोत्थान एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. तुळशी मातेचा विवाह शालिग्राम रूपात भगवान विष्णूशी झाला आहे. असे मानले जाते की तुळशीचे लग्न केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. या दिवशी भगवान श्रीहरी आणि तुळशी मातेची विधिवत पूजा केली जाते.
द्रिक पंचांगानुसार द्वादशी तिथी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ०४ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होईल आणि १३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०१ वाजून ०१ मिनिटांनी संपेल. उदयतिथी वैध असल्याने यावर्षी तुळशी विवाह १३ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे.
लाभ- उन्नती : सकाळी ०६ वाजून ४२ मिनिटांपासून ते ०८ वाजून ०२ मिनिटांपर्यंत.
अमृत - सर्वोत्तम : सकाळी ०८ वाजून ०२ मिनिटांपासून ते ०९ वाजून २३ मिनिटांपर्यंत.
शुभ - उत्तम: सकाळी १० वाजून ४४ मिनिटांपर्यंत ते दुपारी १२ वाजून ०४ मिनिटांपर्यंत.
लाभ - उन्नती : दुपारी ०४ वाजून ०७ मिनिटांपर्यंत ते संध्याकाळी ०५ वाजून २७ मिनिटांपर्यंत.
शुभ - उत्तम: ०७ वाजून ०७ मिनिटांपासून ते ०८ वाजून ४६ मिनिटांपर्यत.
सर्वप्रथम तुळशीचे रोप मध्यभागी ठेवावे. तुळशीच्या भांड्याच्या वर उसाचा मंडप सजवावा. माता तुळशीला सर्व सौभाग्याचे साहित्य अर्पण करा आणि लाल चुनरी अर्पण करा. एका फुलाच्या कुंडीत भगवान शाळीग्रामची स्थापना करा. शाळीग्रामाला तांदूळ अर्पण केला जात नाही, तर त्याला तीळ अर्पण करा. दुधात भिजवलेली हळद भगवान शाळीग्राम आणि माता तुळशीला लावा. यानंतर भाजी, मुळा, बोर, आवळ्यासह इतर पूजेच्या साहित्यासह भोग अर्पण करावा. देवाची आरती करा. तुळशीची प्रदक्षिणा करा. त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करा.
असे मानले जाते की, तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान शाळीग्राम आणि माता तुळशीची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. असेही मानले जाते की तुळशी विवाह केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.