Tulsi Vivah Shubh Muhurta : तुळशी विवाहासाठी ही सर्वोत्तम वेळ, जाणून घ्या पूजेची सोपी पद्धत
मराठी बातम्या  /  धर्म  /  Tulsi Vivah Shubh Muhurta : तुळशी विवाहासाठी ही सर्वोत्तम वेळ, जाणून घ्या पूजेची सोपी पद्धत

Tulsi Vivah Shubh Muhurta : तुळशी विवाहासाठी ही सर्वोत्तम वेळ, जाणून घ्या पूजेची सोपी पद्धत

Nov 12, 2024 11:30 AM IST

Tulsi Vivah 2024 Shubh Muhurta : हिंदू धर्मात तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशी विवाहाने चातुर्मासाची सांगता होते आणि तुळशी विवाहानंतर लग्नसराईला आणि शुभ कार्याला सुरुवात होते. जाणून घ्या तुळशी विवाहाची सर्वोत्तम वेळ आणि पद्धत-

तुळशी विवाह २०२४ मुहूर्त
तुळशी विवाह २०२४ मुहूर्त

हिंदू धर्मात तुळशी विवाह अत्यंत शुभ मानला जातो. काही लोक एकादशी तिथीला तुळशी विवाह करतात तर काही द्वादशी तिथीला तुळशीपूजन करतात. असे मानले जाते की तुळशी विवाह केल्याने व्यक्तीला कन्यादानाइतके पुण्य प्राप्त होते. देवउठनी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रातून उठल्यानंतर संध्याकाळी पूजा केली जाते. जाणून घ्या तुळशी विवाहाची सर्वोत्तम वेळ आणि पूजा पद्धत-

एकादशी तिथी कधीपासून केव्हापर्यंत- एकादशी तिथी ११ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४६ मिनिटांनी सुरू झाली असून, १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजून ४ मिनिटांनी संपणार आहे. तर द्वादशी तिथी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०४ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०१ वाजून ०१ मिनिटांनी संपेल.

यावर्षी देवउठनी एकादशी १२ नोव्हेंबर २०२४, मंगळवार रोजी आहे. तर तुळशी विवाह १३ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल.

तुळशी विवाह-सर्वार्थ सिद्धी योगासाठी उत्तम मुहूर्त

तुळशी विवाहासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:५२ ते ०५:४० या वेळेत असेल. तुळशी विवाहाचा अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल.

तुळशी विवाह-लाभासाठी शुभ चौघडिया मुहूर्त

उन्नती : सकाळी १०.४३ ते दुपारी १२.०४

अमृत - सर्वोत्तम : दुपारी १२.०४ ते दुपारी ०१:२५

शुभ - उत्तम : दुपारी ०२:४६ ते ०४:०७

लाभ - उन्नती : सायंकाळी ०७:०७ ते ०८:४६

तुळशी विवाह पूजा पद्धत

पूजास्थळ गंगेच्या पाण्याने शुद्ध करून ऊसाने मंडप सजवावा. यानंतर तुळशीचे वृंदावन गेरू आणि फुलांनी सजवा. एका चौरंगावर स्वच्छ लाल कापड पसरवा. आता कलश प्रतिष्ठापना करा. पूजेच्या ठिकाणी आंब्याची पाने लावा. आता चौरंगावर माता तुळशी आणि भगवान शालिग्राम ची स्थापना करा. यानंतर त्यांना गंगेच्या पाण्याने स्नान घालावे. आता माता तुळशीला लाल वस्त्र आणि शालिग्रामला पिवळे वस्त्र अर्पण करा. माता तुळशीला सौभाग्याचे सामान अर्पण करा. आता धूप आणि तुपाचा दिवा लावा. शालिग्रामचे पद हातात उचलून तुळशीमातेची सात वेळा प्रदक्षिणा करा. नैवेद्य म्हणून खीर किंवा मिठाई अर्पण करा. मंगलाष्टक आणि आरती म्हणा. शेवटी क्षमा प्रार्थना करा. 

तुळशीविवाह घराच्या अंगणात करावा. यासाठी सूर्यास्तानंतरची संध्याकाळची वेळ निवडा. असे मानले जाते की ज्या घरात शालिग्राम जी (भगवान विष्णु) आणि तुळशी मातेचा विवाह होतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.

 

Whats_app_banner