Tulsi Vivah 2024 Remedies : दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी किंवा द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवशी देवी तुळशीचा विष्णूच्या शाळीग्राम रूपाशी विधिवत विवाह केला जातो. असे मानले जाते की तुळशी विवाह आयोजित केल्याने दांपत्य जीवनात आनंद मिळतो आणि चांगले आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. यावर्षी देवउठनी एकादशी आणि तुळशी विवाह १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. देवउठनी एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा कार्तिकी एकादशीही म्हणतात. या दिवशी विधिवत तुळशी विवाह आयोजित केला जातो. या वेळी केलेले काही खास उपाय शुभ मानले जातात. जाणून घेऊया तुळशी विवाहाच्या दिवशी काय करावे?
> तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे पान स्वच्छ लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवावे. या उपायाने आर्थिक समस्या दूर होतात आणि पैशांची कमतरता भासत नाही, असे मानले जाते.
> तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुळशीच्या रोपावर गंगाजल अर्पण करावे आणि संध्याकाळी झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा आणि विधिवत पूजा करावी. असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होते, असे मानले जाते.
> माता तुळशीचा भगवान शाळीग्रामशी विवाह अत्यंत शुभ मानला जातो. असे केल्याने माता तुळशी साधकाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात, असे म्हटले जाते.
> तुळशी विवाहाच्या दिवशी पूजेमध्ये हळद, चंदन आणि कुंकवाचा चा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
> लग्नाच्या दिवशी तुळशी मातेला गोड पान, खीर आणि फळे अर्पण करावीत. या सर्व वस्तू विष्णूला अर्पण करा आणि पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटून घ्या.
> तुळशी विवाहादरम्यान 'ॐ श्रीकृष्ण गोविंदाय प्रणत कलमाय नमो नम:' आणि 'ॐ नमो भगवते वासुदेवाय गोविंदाय नमो नम:' या मंत्राचा जप करावा.
> तुळशी विवाहाच्या दिवशी दानकर्मेही अत्यंत शुभ मानली जातात. या दिवशी ब्राह्मणांना कपडे, फळे आणि मिठाई भेट द्यावी. असे मानले जाते की यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.
डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.