Tulsi Vivah 2024: तुळशीविवाहाच्या दिवशी करा हे ७ खास उपाय, तुमचे वैवाहिक जीवन होईल मधुर!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Tulsi Vivah 2024: तुळशीविवाहाच्या दिवशी करा हे ७ खास उपाय, तुमचे वैवाहिक जीवन होईल मधुर!

Tulsi Vivah 2024: तुळशीविवाहाच्या दिवशी करा हे ७ खास उपाय, तुमचे वैवाहिक जीवन होईल मधुर!

Nov 12, 2024 04:53 PM IST

Tulsi Vivah 2024: यंदा शुभ योगात तुळशी विवाह पूजन होणार आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय केल्यास वैवाहिक जीवनात सुरू असलेला कलह दूर होऊ शकतो.

तुळशीविवाहाच्या दिवशी करा हे ७ खास उपाय, तुमचे वैवाहिक जीवन होईल मधुर!
तुळशीविवाहाच्या दिवशी करा हे ७ खास उपाय, तुमचे वैवाहिक जीवन होईल मधुर!

Tulsi Vivah Upay: दरवर्षी कार्तिक महिन्यात तुळशी विवाह होतो. तुळशी विवाहानंतरच शुभ कामांना सुरुवात होते. कार्तिक महिन्यात भगवान विष्णूच्या लाडक्या तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की तुळशीचा विवाह लावल्याने कन्यादानाचे पुण्यफळ मिळते. तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय केल्यास वैवाहिक जीवनात सुरू असलेला कलह दूर होऊ शकतो. त्यामुळे आपल्या घरातील सुख वाढविण्यासाठी आणि वैवाहिक जीवन गोड करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी करा हे खास उपाय-

तुळशी विवाहाच्या दिवशी करावयाचे उपाय

१. तुमच्या वैवाहिक जिवनात कटुता आली असेल तर चिंता करण्याचे कारण नाही. यावर उपाय आहे आणि हा कार्तिक महिना असल्याने वैवाहितक जीवनातील कलह दूर करण्यासाठी उपाययोजना केली जाऊ शकते. याचे कारण म्हणजे या महिन्यात तुळशी विवाह असतो.  वैवाहिक जीवनातील कटुता दूर करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी माता आणि शाळिग्राम यांच्या विवाहाची पूर्ण विधीने पूजा करावी.

२. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीमातेला कुंकू, टिकलीसह सोळा शृंगाराच्या वस्तू अर्पण करा. असे केल्याने अखंड सौभाग्याचे वरदान मिळते.

३. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वच भक्त प्रयत्न करत असतात. यासाठी उपवास करणे आणि विधिवत पूजा करणे असे उपाय केले जाता. एकीकडे भगवान विष्णू आणि माता तुळशीची पूजा करत असताना एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये. तसेच तुळस आणि तुळशीच्या पानांना स्पर्श करणे टाळायवा हवे.

४. घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठीही अनेक उपाय केले जातात. पूजाअर्चा तसेच नवस बोलले जातात. मात्र कार्तिक मासात दारिद्र्य दूर करण्याची संधी प्राप्त झाली आहे. कारण या महिन्यात असलेल्या तुळशी विवाहाचा दिवस असून या दिवशी तुम्हाला तुळशीमातेचा आशीर्वाद लाभू शकतो. म्हणूनच घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा.

५. तुळशी विवाहाला तुळशीच्या झाडाला ७ वेळा प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर सायंकाळी तुपाचा दिवा लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

६. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीसूत्राचे पठण केल्याने धनप्राप्ती होते.

७. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला घरात बनवलेली सात्विक खीर अर्पण केल्याने लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner