मराठी बातम्या  /  धर्म  /  Tulsi Vivah: २३ की २४ नोव्हेंबर, तुळशीचा विवाह नेमका कधी? तारखेचं कन्फ्यूजन लगेच करा दूर

Tulsi Vivah: २३ की २४ नोव्हेंबर, तुळशीचा विवाह नेमका कधी? तारखेचं कन्फ्यूजन लगेच करा दूर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Nov 17, 2023 11:05 PM IST

Tulsi Vivah 2023 Exact Date: यंदा तुळशी विवाह नेमका कधी साजरा केला जाईल? याबाबत जाणून घेऊयात.

Tulsi Vivah 2023
Tulsi Vivah 2023

Tulsi Vivah 2023 Date and Time: कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला प्रदोष काळात तुळशी विवाह साजरा केला जातो. या दिवशी तुळशीचा विवाह शालिग्रामशी होतो. लसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशी विवाहाच्या दिवशी द्वादशी तिथी २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.०१ वाजता सुरू होईल आणि २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.०६ वाजता समाप्त होईल. यामुळे यंदा तुळशीचा विवाह कधी साजरा केला जाईल, याबाबत जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

उदय तिथीनुसार २३ नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे. प्रदोष काळात तुळशी विवाह आयोजित केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी सायंकाळी ५.२५ पासून प्रदोष काल सुरू होत आहे. यंदा तुळशी विवाहच्या दिवसी अमृत ​​सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि सिद्धी योग असे तीन योग जुळून येणार आहेत.

आषाढ शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू चार महिने योग निद्रामध्ये लीन झाले. कार्तिक महिन्याच्या देवूथनी एकादशीला त्यांना जाग आली. भगवान विष्णूच्या जागरणानंतर तुळशीचा शिलाग्राम अवताराशी विवाह करण्याची परंपरा आहे.

तुळशीविवाहाच्या दिवशी घरातील देवाची पूजा करावी. संध्याकाळी तुळशीला आणि शालीग्रामला आंघोळ घालण्यात यावी. यादिवशी अंगणातील तुळशीच्या रोपांना लाल लाल कापड, टिकली आणि मेकअपच्या इतर वस्तू अर्पण केल्या जातात. तुळशी आणि भगवान शालिग्राम यांच्यावर अक्षता टाकावी. यानंतर आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावेत.

WhatsApp channel