Tulsi Pujan Diwas : आज तुळशी पूजनाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Tulsi Pujan Diwas : आज तुळशी पूजनाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या

Tulsi Pujan Diwas : आज तुळशी पूजनाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या

Dec 25, 2024 07:48 PM IST

Tulsi Pujan Diwas In Marathi : तुळशी पूजनाचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस देवी तुळशीला समर्पित आहे. हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दहाव्या दिवशी तुळशीपूजनाचा दिवस साजरा केला जातो. जाणून घ्या या दिवशी काय करावे आणि काय करू नये ते.

तुळशी पूजन दिवस
तुळशी पूजन दिवस (Unsplash)

दरवर्षी २५ डिसेंबर हा तुळशी पूजन दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, या दिवशी तुळशीची पूजा केल्याने साधकाला देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते. परंतु यादरम्यान काही गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरुन तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळू शकेल.

तुळशी पूजनाचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस देवी तुळशीला समर्पित आहे. हिंदू धर्मात या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी व्रत पाळण्यासोबतच तुळशीच्या रोपाची विशेष पूजा केली जाते, ज्यामुळे अक्षय्य फळ मिळते. दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दहाव्या दिवशी तुळशीपूजनाचा दिवस साजरा केला जातो.

तुळशी पूजन २०२४ -

पंचांगानुसार, यावर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथी मंगळवार, २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी सुरू झाली असून. आज बुधवार, २५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून २९ मिनिटांनी समाप्त होत आहे. उदयातिथी लक्षात घेतल्यास २५ डिसेंबरलाच तुळशीपूजनाचा दिवस साजरा केला जात आहे.

तुळशी पूजनाच्या दिवशी काय करावे -

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे परिधान करावे. देवपूजा करून तुळशीची पूजा करावी, तुळशीला जल अर्पण करावे. यानिमित्ताने धार्मिक कार्यात सहभागी व्हावे. या तिथीला गंगा नदीत पवित्र स्नान करायला जावे. या दिवशी जास्तीत जास्त तीर्थक्षेत्रांना भेट देऊन पूजा करावी. या दिवशी सात्विकतेचे पालन करावे. या तिथीला ब्राह्मण किंवा गरजूंना अन्न आणि वस्त्र दान करा.

तुळशी पूजनाच्या दिवशी काय करू नये -

या दिवशी सूडबुद्धीच्या गोष्टी टाळा. या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन टाळावे. या दिवशी कोणाशीही वाद घालू नका. या दिवशी तुळशीची पाने तोडणे टाळावे. या व्यतिरिक्त खोटे बोलणे, मत्सर आणि लोभ या प्रसंगी टाळा. रागाने कोणाशीही बोलू नये.

तुळशीची पाने तोडताना काय काळजी घ्यावी -

तुळशीला नेहमी आंघोळीनंतरच स्पर्श करावा. तुळशीची पाने तोडण्यापूर्वी देवीचे ध्यान करावे आणि हात जोडून ती पाने तोडण्याची परवानगी घ्यावी. यासोबतच पाने हलक्या हाताने तोडून घ्या. या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतरच भगवान विष्णू तुळशीला नैवेद्य म्हणून स्वीकारतात. सूर्यास्तानंतर तुळशीची पाने कधीही तोडू नयेत, असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो, त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच विनाकारण तुळशीची पाने तोडू नका, अन्यथा शुभ फळ मिळणार नाही.

 

 

Whats_app_banner