Mangala Gowri : त्र्यंबकेश्वर मंदिरांचं वेळापत्रक बदललं; श्रावण महिन्यात भाविकांसाठी खास सोय
Trimbakeshwar Mandir News : श्रावण महिना सुरू झाल्यापासून नाशिकमधील त्रंबकेश्वर मंदिरात भाविकांना मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे.
Trimbakeshwar Mandir Nashik : श्रावण महिना सुरू झाल्यापासून नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतून लाखो भाविक त्रंबकेश्वर मंदिरात दाखल होत दर्शन घेत आहे. मंदिर परिसरात सातत्याने गर्दी होत असताना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांना दर्शनासाठी दररोज सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय श्रावण सोमवारी पहाटे चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाची सोय करून देण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून घेण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात लोक उपवास करत मांसाहार करणं बंद करत असतात. महादेवाची पूजा करत लोक आयुष्यातील सुख आणि समाधानासाठी प्रार्थना करत असतात. त्यामुळं श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे. श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याने मंदिर प्रशासनाने दर्शनाची वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची वाढत असलेली गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक शहर पोलिसांकडूनही भाविकांची सुरक्षा आणि सोयीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्रंबकेश्वरमध्ये ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
त्रंबकेश्वर मंदिरात भाविकांना वातानुकूलित दर्शनाचीही सोय करण्यात आला आहे. त्यामुळं भाविकांची संख्या वाढली तरी सगळ्यांना व्यवस्थितपणे दर्शन घेता येणार आहे. महिला, जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांना दर्शनाची खास सोय करण्यात आली आहे. भाविकांना पिण्याचे पाणी आणि प्राथमिक आरोग्य कक्ष तयार करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरच्या गावकऱ्यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिला जाणार असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दर्शनासाठी भाविकांना वेगवेगळ्या रांगेतून आत सोडलं जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता श्रावण महिन्यात त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांकडून मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे.