मराठी बातम्या  /  Religion  /  Tortoise Ring Benefits And Wearing Rules For Ladies And Mens In Marathi See Details

tortoise ring : कासवाच्या आकाराची अंगठी घालताय?, या गोष्टींची काळजी घ्या अन्यथा...

tortoise ring benefits in marathi
tortoise ring benefits in marathi (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Sep 15, 2023 04:41 PM IST

tortoise ring benefits : कासवाच्या आकाराची अंगठी घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळं व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत असतात.

tortoise ring benefits in marathi : सध्याच्या काळात अनेक लोकांना विविध प्रकारच्या अंगठ्या घालण्याची आवड असते. वेगवेगळे रंग आणि डिझाईनच्या अंगठ्यांची बाजारात मोठी मागणी आहे. परंतु तरीदेखील अनेक लोक कासवाच्या आकाराची अंगठी घालणं पसंत करत असतात. त्यामागे धार्मिक कारण आहे. कासवाच्या आकाराची अंगठी हातात घातल्यास त्यामुळं व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत असतात. सुख, शांती, धनप्राती, कौटुंबिक समाधान आणि यश मिळत असल्याची अनेकांनी धारणा आणि श्रद्धा असते. त्यामुळं आता अशा प्रकारची अंगठी घालत असताना कोणत्या नियमांचं पालन करायला हवं, जाणून घेवूयात.

ट्रेंडिंग न्यूज

अंगठी घालताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?

बाजारातून कासव्याच्या आकाराची अंगठी खरेदी केल्यानंतर त्याला दूध किंवा गंगाजलाने स्वच्छ धुवून काढायला हवं. त्यामुळं अंगठी पूर्णपणे साफ आणि चमकदार होईल. त्यानंतर या अंगठीला माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावे. पूजाअर्चा केल्यानंतरच अंगठी बोटांमध्ये घालायला हवी. आठवड्यातील दोन दिवस या अंगठीला परिधान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गुरुवार आणि शुक्रवारी या अंगठीला घातल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक प्रश्न संपतील. याशिवाय नोकरी आणि व्यापारात भरभराट होते, असं मानलं जातं. अंगठी बोटात घालत असताना कासवाचं मुख तुमच्या खांद्याच्या दिशेने असायला हवं.

कासवाच्या आकाराची अंगठी चांदीची असेल तर ते तुमच्यासाठी सदैव लाभदायक असते. कारण चांदीच्या अंगठीमुळं तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य लाभण्यास मदत होत असते. याशिवाय कुटुंबातील सर्वांचे आर्थिक प्रश्न सुटत असतात. मुलांना करियरमध्ये मोठं यश मिळत असतं. त्यामुळं आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच गुरुवारी आणि शुक्रवारी कासवाच्या आकाराच्या अंगठी बोटांमध्ये घातल्यास तुमचं नशीब पालटू शकतं.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)