ttd e tickets news : वैकुंठ एकादशी निमित्तानं तिरुपती दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा; कधी होणार सुरू? वाचा सविस्तर
मराठी बातम्या  /  धर्म  /  ttd e tickets news : वैकुंठ एकादशी निमित्तानं तिरुपती दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा; कधी होणार सुरू? वाचा सविस्तर

ttd e tickets news : वैकुंठ एकादशी निमित्तानं तिरुपती दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग सुविधा; कधी होणार सुरू? वाचा सविस्तर

Dec 26, 2024 03:18 PM IST

Tirumala Tirupati News In Marathi : नवीन वर्षातील पहिल्या एकादशी निमित्त लाखो भाविक तिरुमलाच्या श्री व्यंकटेश्वर मंदिराला भेट देतील. मंदिर व्यवस्थापनाने ऑनलाइन तिकीट बुकिंग, दर्शन टोकन वितरण आणि भाविकांच्या सोयीसाठी विशेष तयारी केली आहे.

वैकुंठ एकादशीनिमित्त तिरूपती मंदिरात ऑनलाईन बुकिंग सुविधा
वैकुंठ एकादशीनिमित्त तिरूपती मंदिरात ऑनलाईन बुकिंग सुविधा (HT_PRINT)

सनातन धर्मात वैकुंठ एकादशीला खूप महत्त्व आहे. या एकादशीला पुत्रदा एकादशीही म्हणतात. नवीन वर्ष २०२५ मध्ये १० जानेवारी रोजी एकादशी साजरी केली जाईल. या एकादशीनिमित्त आणि नवीन वर्षानिमित्त १० ते १९ जानेवारी या कालावधीत तिरुपती येथे विविध कार्यक्रमाचे नियोजन केले गेले आहे. यानिमित्त तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात लाखो भाविक भेट देतील.

मंदिर व्यवस्थापनाने कार्यक्रमाची विशेष तयारी - 

दर्शन, पूजा, ऑनलाइन तिकीट बुकिंगपासून ते दर्शन तिकीट वाटपापर्यंत भाविकांच्या सुविधा लक्षात घेऊन व्यवस्थापनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थानमला ११ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू झाले आहे. २३ डिसेंबर २०२४ पासून तिकिटे उपलब्ध व्हायला सुरवात झाली आहे. मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सामावून घेण्यासाठी मोफत अन्नदान, लाडू, वाहतूक व्यवस्थापन आदी सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.

वैकुंठ एकादशी आणि द्वादशीची ठळक वैशिष्ट्ये -

वैकुंठ एकादशी दिवस (१० जानेवारी, २०२५) : व्हिआयपी प्रोटोकॉलचे दर्शन पहाटे ४:४५ वाजता सुरू होईल. सकाळी ९ वाजेपासुन ते ११ वाजेपर्यंत भव्य सुवर्ण रथाची मिरवणूक निघेल.

द्वादशी दिवस (११ जानेवारी २०२५) : श्रीवरी पुष्करिणी (मंदिर तलाव) येथे सकाळी ५:३० ते ६:३० दरम्यान चक्रास्नानम विधी होईल.

ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा केव्हा सुरू होईल -

वैकुंठ द्वार दर्शन तिकीट बुकिंग २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होईल.

विशेष प्रवेश दर्शन (SED) तिकिटे २४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन उपलब्ध.

तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या अधिकृत वेबसाइटवर भक्त तिकीट बुक करू शकतात. वैकुंठ द्वारम हा गर्भगृहाला वेढलेला पवित्र मार्ग आहे. १० दिवस चालणाऱ्या वैकुंठ एकादशीच्या उत्सवादरम्यान ते खुले राहील, ज्यामुळे भक्तांना एक अनोखा आणि दिव्य अनुभव मिळेल.

मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, तिरुपतीमधील आठ आणि तिरुमला येथील एका केंद्रावर स्लॉटेड सर्व दर्शन (SSD) टोकन वितरित केले जातील . 

याठिकाणी मिळेल तिकीट -

तिरुपती : एमआर पल्ली, जीवकोना, रामनायडू स्कूल, रामचंद्र पुष्करिणी, इंदिरा मैदान, श्रीनिवासम, विष्णू निवासम, भूदेवी कॉम्प्लेक्स 

तिरुमाला : कौस्तुभम अतिथीगृह

तिरुमला तिरुपती देवस्थानम TTD च्या मुख्य अभियंत्याने खात्री केली आहे की या केंद्रांवर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व आवश्यक सुविधा उभारल्या जातील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की वैध दर्शन टोकन असलेल्यांनाच वैकुंठ द्वार दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल. टोकन नसलेले लोक तिरुमालाला भेट देऊ शकतात, परंतु त्यांना दर्शन रांगेत प्रवेश मिळणार नाही.

यात्रेकरूंसाठी सुविधा -

मोफत अन्न वितरण (अन्नदान) : सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होईल आणि मध्यरात्रीपर्यंत अन्नदान होईल. चहा, कॉफी, दूध, उपमा वाटप होईल.

लाडू वितरण : जास्तीत जास्त भाविकांना प्रसाद मिळावा यासाठी साडे ३ लाख लाडूंचा अतिरीक्त साठा ठेवला जाईल.

वाहतूक व्यवस्थापन : मंदिराभोवती सुरळीत वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक पोलिसांनी TTD सोबत समन्वय साधला आहे.

 

 

Whats_app_banner