मराठी बातम्या  /  धर्म  /  Tulsi Tips : तुळशीची पानं तोडताना या नियमांचे पालन करा, आयुष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत

Tulsi Tips : तुळशीची पानं तोडताना या नियमांचे पालन करा, आयुष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत

Feb 13, 2024 06:34 PM IST

Tulsi Tips : तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरात तुळशीचे रोप लावणे आवश्यक आहे. तुळशीची पाने तोडण्याचे काही खास नियम पुराणात सांगण्यात आले आहेत.

Tulsi Tips
Tulsi Tips

सनातन धर्मात तुळशीचे रोप खूपच पूजनीय आहे. मान्यतेनुसार दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीच्या रोपांची पूजा करून त्याला पाणी दिल्यास साधकाला शुभ फळ प्राप्त होते. तुळशीच्या रोपांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरात तुळशीचे रोप लावणे आवश्यक आहे. 

सोबतच, तुळशीची पाने तोडण्याचे काही खास नियम पुराणात सांगण्यात आले आहेत. जर त्याचे पालन केले नाही तर व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया तुळशीची पाने तोडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या.

ट्रेंडिंग न्यूज

तुळशीची पाने तोडतान हे लक्षात ठेवा

- तुळशीची पाने तोडताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुळशीची पाने नखाने तोडू नयेत. त्याची पाने हलक्या हाताने तोडून घ्या.

- सनातन धर्मात तुळशीच्या रोपाला अधिक महत्त्व आहे. या वनस्पतीमध्ये सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावण्याची परंपरा आहे. शास्त्रानुसार अमावस्या, द्वादशी आणि चतुर्दशीला चुकूनही तुळशीची पाने तोडू नयेत.

- याशिवाय एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे वर्ज्य आहे. एकादशीला भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करायची असल्यास ती,  एक दिवस आधीच तोडून ठेवावीत.

- तुळशीचे रोप सुकल्यावर ते जमिनीखाली गाडून टाका किंवा नदीच्या वाहत्या पाण्यात सोडून द्या. वाळलेली तुळस अस्वच्छ ठिकाणी फेकू नका. कारण या वनस्पतीमध्ये लक्ष्मीचा वास असतो.

- तुमच्या घरातील तुळशीचे रोप सुकले असेल तर त्या ठिकाणी नवीन रोप लावू शकता. तुळशीचे रोप लावण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ मानला जातो.

…तर तुळशीची विधीनुसार पूजा करणे आवश्यक

जर तुळशीची पाने पिवळी पडून पडू लागली तर याचा अर्थ तुमची उपासना सफल होत नाही, त्यात काही अडथळा आहे. अशा स्थितीत विधीनुसार पूजा करणे आवश्यक आहे. त्याच वेळी, खूप काळजी घेऊनही तुमच्या तुळशीची भरभराट होत नसेल, तर देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे.

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel