मराठी बातम्या  /  धर्म  /  Laxmi Devi : गुरुवारी या मंत्रांचा उच्चार ठरेल लाभदायी; लक्ष्मीच्या कृपेने व्हाल कोट्यधीश

Laxmi Devi : गुरुवारी या मंत्रांचा उच्चार ठरेल लाभदायी; लक्ष्मीच्या कृपेने व्हाल कोट्यधीश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 23, 2023 09:32 AM IST

laxmi devi mantra : प्रत्येकाच्या आयुष्यात धर्माचं विशिष्ट महत्त्व असतं. त्यामुळं लोक सुख आणि समृद्धीसाठी देवांकडे प्रार्थना करत असतात.

laxmi devi mantra in marathi
laxmi devi mantra in marathi (HT)

laxmi devi mantra in marathi : दिवसाची सुरुवात करताना अनेक लोक लक्ष्मी देवतेची पूजा करत प्रार्थना करत असतात. आयुष्यात सुख आणि समृद्धी तसेच धनलाभ होण्यासाठी भाविक लक्ष्मीदेवतेला साकडं घालत असतात. परंतु दिवसाची सुरुवात करताना लक्ष्मीदेवतेच्या पाच मंत्रांचा उच्चार केल्यास आयुष्यात नेहमीच पैशांची कमतरता जाणवत नाही. याशिवाय आरोग्य संपदा प्राप्त होताना कौटुंबिक कलह कमी होण्यास मदत होते. त्यामुळं आता दिवसातून लक्ष्मीदेवतेच्या काही मंत्रांचा जप करायला हवा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ कपडे घालून मंत्रांचा उच्चार केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्यास मदत होत असते.

ट्रेंडिंग न्यूज

धनलाभासाठी कोणत्या मंत्रांचा जप कराल?

१. ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नमः:।।

२. ऊँ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:

३. ऊँ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।

४. पद्मानने पद्म पद्माक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्।

५. ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:

लक्ष्मीदेवतेला कसं प्रसन्न कराल?

सकाळी झोपतून उठल्यानंतर अंघोळ करा, त्यानंतर स्वच्छ कपडे घालून जवळील लक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घ्या. लक्ष्मीचं दर्शन घेताना आणि पूजा करताना देवीला निळ्या किंवा गुलाबी रंगाची फुलं अर्पण करायला हवं. घरात किंवा कामावर असताना लक्ष्मीच्या मंत्रांचा जप केल्यास त्यामुळं व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्यास मदत होते. याशिवाय लक्ष्मीदेवता प्रसन्न होऊन भक्तांवर धनवर्षाव करण्यास सुरुवात करत असते. सुख-संपत्ती आणि आरोग्य संपदाही भाविकाला मिळत असते. त्यामुळं तुम्ही दररोज तुमच्या वेळेनुसार आणि आवश्यकतेनुसार लक्ष्मी देवतेच्या मंत्रांचा उच्चार करू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारीत आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग