thumb palmistry lines meaning in marathi : हाताची बोटं आणि त्यावरील रेषांच्या आधारावर व्यक्तीचा स्वभाव व त्याचे भविष्याची माहिती मिळवली जाऊ शकते. कारण हातांच्या बोटांच्या रेषेत व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित अनेक पैलू लपलेले असतात. प्रत्येक कामात हात प्रामुख भूमिका बजावत असल्याने हात मानवी शरीराचं प्रतिनिधित्व करत असल्याचं नेहमीच बोललं जातं. त्यामुळंच ज्योतिष शास्त्रामध्ये हात आणि अंगठ्याचं फार महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं आयुष्याचे अनेक पैलू आणि गुपितं उघड होण्याची शक्यता असते. तसेच बोटांवरील रेषांवरून व्यक्तीचा स्वभाव देखील ओळखता येत असतो. त्यामुळं हस्तरेखा शास्त्रानुसार तुमच्या आयुष्यातील काय दडलंय जाणून घेऊयात.
हस्तरेखा शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या हातावरील नखाचा भाग लांब असेल तर समजून जा की त्याला इतरांशी बोलायला प्रचंड आवडतं. असे व्यक्ती इतरांवर प्रभाव टाकताना स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय नखांचा भाग लांब असणाऱ्या व्यक्तींचे अन्य लोक आकर्षित होत असतात. याशिवाय ज्या व्यक्तींच्या नखांचा भाग लहान तसेच रुंद असेल तर तो व्यक्ती फार चिडचिडा असू शकतो. त्याला कोणतेही काम प्रामाणिकपणे करणं आवडत नाही. त्यामुळं लहान नखं असलेला व्यक्ती कामचुकार असल्याचं नेहमीच बोललं जातं.
ज्या व्यक्तींच्या नखाचा भाग रुंद तसेच समोर गोल असेल तर व्यक्ती अतिशय रागीट आणि हट्टी असू शकते. अशी लोक नेहमीच भांडणासाठी तयार असतात. ज्या लोकांच्या हाताचा अंगठा मागे वाकलेला असतो ते लोक प्रचंड उदार असतात. कुठल्याही क्षणी लोकांना मदत करणं आणि सतत समाजाचा विचार करणं या लोकांच्या नशिबात असल्याचं मानलं जातं.
ज्या लोकांची नखं सपाट असतात त्या लोकांना किरकोळ कारणावरून प्रचंड राग येत असतो. याशिवाय ज्या लोकांचा अंगठा लांब असतो, ते इतरांसोबत बोलण्यात जास्त वेळ घालवतात. परंतु ते सहजासहजी कुणावर विश्वास ठेवत नाहीत. परंतु अशा प्रकारच्या लोकांकडे तर्कशक्ती चांगली असते. त्यामुळं ते कोणत्याही विषयांना चांगल्या प्रकारे समजू शकतात. एखाद्याचा अंगठा जाड असेल तर त्याच्या स्वभावाला समजणं फार कठिण असतं. ते कधीही आक्रमक होऊ शकतात, त्यामुळं अशा लोकांसोबत बोलताना संयम बाळगा आणि दक्षता बाळगणं गरजेचं आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)