मराठी बातम्या  /  धर्म  /  Vastu Tips : 'या' १५ वास्तू टिप्स तुमचं आयुष्य बदलून टाकतील!

Vastu Tips : 'या' १५ वास्तू टिप्स तुमचं आयुष्य बदलून टाकतील!

HT Marathi Desk HT Marathi
Apr 24, 2023 03:33 PM IST

Vastu Tips : आयुष्यातील कटुता, ताणतणाव घालवायचे असतील तर पुढील १५ वास्तू टिप्स तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात.

Vastu Tips
Vastu Tips

Vastu Tips : घरोघरी मातीच्या चुली असं म्हणतात. कुटुंब म्हटलं की तिथं कुरबुरी, ताण-तणाव, वाद होतातच, यात अनेकदा माणसाच्या स्वभावाचा दोष असतो. मात्र, घराचीची रचना आणि त्यातील वस्तूंची ठेवणही कधी-कधी त्यास कारणीभूत ठरते, असं मानलं जातं. वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यातील १५ उपाय अवलंबल्यास तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. तुमच्या जीवनात आनंद व भरभराट आणू शकतात. काय आहेत या वास्तू टिप्स पाहूया…

Ravivar Upay : पैशांची चिंता सतावतेय?, मग रविवारी करा हे खास उपाय

  • आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात धुपाचा धूर करा. त्यामुळं घर प्रसन्न राहतं आणि हे शुभ मानलं जातं.
  • गव्हामध्ये नागकेशराचे दोन दाणे आणि तुळशीची ११ पाने घालून ते दळून घ्या. हे देखील शुभ मानलं जातं.
  • मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग घालून तो प्रज्वलित करणं शुभ मानलं जातं.
  • दर गुरुवारी घरातील तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करणं लाभदायक असतं.
  • तव्यावर रोटी भाजण्यापूर्वी दूध शिंपडणं शुभ असतं.
  • पहिली भाकरी गायीसाठी काढून ठेवणं शुभसूचक मानलं जातं.
  • तुमच्या घरातील तीन दरवाजे एकाच रेषेत नसतील याची काळजी घ्या.
  • सुकलेली फुले घरात कधीही ठेवू नका.
  • संत, महापुरुषांचे आशीर्वाद देतानाची चित्रे घरात लावा.
  • मोडकं-तोडकं सामान, रद्दी आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू घरात ठेवू नका.
  • घरातील नळ गळणारे नसतील याची काळजी घ्या.
  • गोल आकाराचं फर्निचर घरात असेल तर ते शुभ मानलं जातं.
  • तुळशीचं रोप घरामध्ये पूर्व दिशेला किंवा देव्हाऱ्याजवळ ठेवा.
  • वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा निचरा उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे आर्थिक दृष्टीकोनातून शुभ असते.
  • घराच्या आग्नेय दिशेच्या कोपर्‍यात हिरवळीचं चित्र लावा.

Vastu Tips : घरात लक्ष्मी मातेचा फोटो लावण्याची योग्य दिशा कोणती?

(सूचना: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य व अचूक आहे असा आमचा दावा नाही. वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने ही माहिती देण्यात आली आहे. या गोष्टींचे अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

WhatsApp channel

विभाग