Purushottam Temple: देशातील भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जाणून घ्या महत्त्व आणि आख्यायिका!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Purushottam Temple: देशातील भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जाणून घ्या महत्त्व आणि आख्यायिका!

Purushottam Temple: देशातील भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जाणून घ्या महत्त्व आणि आख्यायिका!

Dec 14, 2024 11:12 AM IST

Purushottam Temple: भारतात भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर एकमेव असून ते महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे आहे. हे मदिर १५०० वर्षे प्राचीन असून ते हेमाडपंथी (Hemadpanthi) मंदिर आहे. भगवान पुरुषोत्तम हे भगवान विष्णूचे (Bhagvan Vishnu) अवतार असल्याची मान्यता आहे.

देशातील भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जाणून घ्या महत्त्व आणि आख्यायिका!
देशातील भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर महाराष्ट्रात, जाणून घ्या महत्त्व आणि आख्यायिका!

Purushottam Temple: भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर भारतात कुठे आहे, असा प्रश्न केल्यास कदाचित कोणीच याचे उत्तर देऊ शकणार नाही. याचे कारण म्हणजे भगवान पुरुषोत्तमाचे भारतात केवळ एकच मंदिर आहे आणि तेही बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तम पुरी येथे. मार्गशीर्ष मास हा अधिकचा मास सुरू आहे. अधिकचा मास हा नेहमीच व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात विविध घार्मिक कार्ये, दानधर्म, पूजापाठ केली जाते. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान पुरुषोत्तमाची पूजा या महिन्यात केली जाते. भगवान पुरुषोत्तमाची पूजा करण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परराज्यांमधून देखील भाविक बीडमधील भगवान पुरुषोत्तमाच्या मंदिरात येतात.

भगवान पुरुषोत्तमाचे भारतात एकमेव मंदिर

भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर हे भारतात केवळ एकच असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे आहे. पुरुषोत्तमपुरी हे बीड जिल्ह्यातील माजलगावहून २२ किलोमीटरच्या अंतरावर आहे.

भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर हेमाडपंथी आहे

भगवान पुरोषोत्तमाचे मंदिर हे हेमाडपंथी असून ते गोदावरीच्या तटावर बांधले गेले आहे. हे मंदिर सुमारे १५०० वर्षांपूर्वी बांधले गेल्याचा उल्लेख येथे असलेल्या शिलालेखात करण्यात आलेला आहे. या मंदिराचा कळस व बांधणी ही उत्तराखंडात असलेल्या केदारनाथ मंदिराच्या पद्धतीची आहे. या मंदिराच्या शेजारीच वरदविनायक, सहलेश्वर महादेव, पार्वती पादुका मंदिर अशी मंदिरे आहेत. ही मंदिरे देखील जुनीच आहेत.

वरदविनायक मंदिर हे वृंदावनातील भगवान श्रीकृष्णाच्या मंदिपाची प्रतिकृती असल्याचे दिसते. या पुरुषोत्तम मंदिरातील भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती ही गंडळी शिळेपासून तयार करण्यात आलेली आहे. ती स्वयंभू असल्याचे सांगितले गेले आहे. हा चतुर्थभुजाधारी पुरुषोत्तम आहे. या पुरुषोत्तमाच्या हातात शंख, चंक्र, पद्म आहे. 

मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात अशी मान्यता

भगवान पुरुषोत्तमाचे हे एकमेव मदिर स्थापत्य कलेचा एक आदर्श नमुना आहे. या मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात असे मानले जाते. मंदिरातील गरुडध्वजा पाहताना पंढरपुरातील मंदिराची आठवण येते असे भाविक सांगतात.

काय आहे मंदिराची आख्यायिका?

असे सांगतात की, शार्दुल नावाचा राक्षस येथील जनतेला त्रास देत होता. त्याचे निर्दालन करण्यासाठी भगवान विष्णूंनी पुरुषोत्तमाचा अवतार घेतला आणि शार्दुल राक्षसाचा शिरच्छेद केला. ते चक्र गोदावरीच्या पाण्यात धुतल्याने ते चक्रतीर्थ म्हणून ओळखले जाते. या चक्रतीर्थात भाविक स्नान करतात आणि विठोबाचे दर्शन घेतात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner