मराठी बातम्या  /  धर्म  /  Kalashtami : भारतातली भगवान कालभैरवांची ही पाच प्रसिद्ध मंदिरं माहिती आहेत का?

Kalashtami : भारतातली भगवान कालभैरवांची ही पाच प्रसिद्ध मंदिरं माहिती आहेत का?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Mar 14, 2023 09:01 AM IST

Five Temples Of Kalbhairav : भारतात भगवान कालभैरवाची पाच अशी मंदिरं आहेत, ज्यांना सर्वात महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे. त्याच पाच मंदिरांविषयी आपण माहिती घेणार आहोत.

भगवान कालभैरव
भगवान कालभैरव (हिंदुस्तान टाइम्स)

हिंदू धर्म शास्त्रात कालाष्टमीच्या दिवशी भगवान शिवाच्या कालभैरव या रुपाची उत्पत्ती झाली होती असं मानलं जातं. कालाष्टमीला भैरव अष्टमी असंही काही ठिकाणी संबोधण्यात येतं. ब्रम्हा,विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांची शक्ती भैरव रुपात सामावली आहे असं मानली जातं. हे भगवान शिवाचं सर्वात उग्र रुप म्हणून पाहिलं जातं. काल भैरवाला काशीचा कोतवाल म्हणूनही ओळखलं जातं. भारतात अशी पाच प्राचीन मंदिरं आहेत जिथंं आवर्जुन कालाष्टमीच्या दिवशी भक्त कालभैरवाचं दर्शन घ्यायला गर्दी करतात. कोणती आहेत ती मंदिरं आणि काय आहे त्या मंदिरांची वैशिष्ट्य हे आपण आज पाहाणार आहोत.

काल भैरव मंदिर, काशी

काशीच्या कालभैरव मंदिराची विशेष ओळख आहे. हे काशीच्या विश्वनाथ मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. इथल्या कालभैरवाला काशीचा कोतवाल असंही म्हणतात. बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतल्यावर जो भक्त या कालभैरवाचं दर्शन घेत नाही, त्याची पूजा सफल झाली असं मानलं जात नाही. त्यामुळे इथे आल्यावर शंभोशंकराचं दर्शन केल्यावर या महाकालाचं अवश्य दर्शन करावं.

कालभैरव मंदिर, उज्जैन

उज्जैनच्या कालभैरव मंदिराला काशीच्या मंदिरानंतर देशातलं दुसरं कालभैरवाचं मंदिर म्हणून महत्व प्राप्त झालं आहे. हे मंदिर क्षिप्रा नदीच्या काठावर वसलं आहे. इथली एक आश्चर्याची बाब म्हणजे उज्जैनच्या कालभारवाला भक्त नैवेद्य म्हणून मद्य अर्पण करतात.

बटुक भैरव मंदिर, नवी दिल्ली

पाच पांडवांमधला एक भीम यांनी ही मूर्ती इथे विराजमान केली असं सांगितलं जातं. ही मूर्ती एका विहिरीवर आगळ्या पद्धतीने स्थापित केली गेली आहे. बाबा बटुक यांना भेट द्यायची असल्यास तुम्हाला दिल्लीच्या विनय मार्ग इथं यावं लागेल.

बटुक भैरव मंदिर पांडव किल्ला

दिल्लीत बाबा भैरव बटुक यांचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची स्थापना पांडव भीम यांनी केली. खरे तर पांडवांनी आणलेले भैरव भीमसेन दिल्लीबाहेर बसले तेव्हा पांडवांना काळजीत पडले. त्यांची काळजी पाहून बटुक भैरवाने त्यांना त्यांच्या दोन जटा दिल्या आणि दुसरी भेरव मूर्ती त्या जटांवर स्थापित करावी असं त्यांनी पांडवांना सांगितलं.

घोरखडल बटुक भैरव मंदिर, नैनिताल

नैनितालजवळील घोरखडलचे बटुक भैरव मंदिरही खूप प्रसिद्ध आहे. इथले भैरव गोलू देवता या नावाने प्रसिद्ध आहेत. मंदिरात असलेल्या पांढऱ्या गोल मूर्तीची पूजा करण्यासाठी इथं न चुकता भाविक येतात.

 

WhatsApp channel

विभाग