मराठी बातम्या  /  धर्म  /  व्हॅलेंटाईन्स डेला तुमच्या पार्टनरसोबत या मंदिरांना भेट द्या, प्रेम वाढेल, आयुष्यभर एकत्र राहाल

व्हॅलेंटाईन्स डेला तुमच्या पार्टनरसोबत या मंदिरांना भेट द्या, प्रेम वाढेल, आयुष्यभर एकत्र राहाल

Feb 06, 2024 05:41 PM IST

Temples For Couples, Valentines Day :फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे. कारण याच महिन्यात प्रेमाचा सण म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. तरुणांमध्ये हा दिवस अधिक लोकप्रिय आहे.

Valentines Day
Valentines Day

Famous Mandir of India : फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे. कारण याच महिन्यात प्रेमाचा सण म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. तरुणांमध्ये हा दिवस अधिक लोकप्रिय आहे. अशा परिस्थितीत जर तुमचे नुकतेच लग्न झाले असेल किंवा तुम्ही लग्न करणार असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या मंदिरांना भेट देऊ शकता. 

प्रेम मंदिर

वृंदावनचे प्रेम मंदिर भगवान कृष्ण-राधा आणि राम-सीता यांना समर्पित आहे. या मंदिराचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक लांबून येतात. रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमुळे या मंदिराचे सौंदर्य आणखीनच वाढते. नावाप्रमाणेच हे मंदिर प्रेमाचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या.

ट्रेंडिंग न्यूज

त्रिनेत्र गणेश मंदिर

हिंदू मान्यतेनुसार, लग्नाचे पहिले आमंत्रण भगवान गणेशाला दिले जाते. रणथंबोर, राजस्थानचे त्रिनेत्र गणेश मंदिर हे प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे जगातील एकमेव मंदिर आहे, जिथे गणपतीला पत्रे आणि निमंत्रण पत्रिका पाठवल्या जातात. मान्यतेनुसार असे केल्याने सर्व कार्य सुरळीतपणे पार पडते. नवविवाहित जोडपी आणि लवकरच लग्नाच्या बेडीत अकडणारी जोडपी देखील या मंदिरात गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात.

तिरुपती मंदिर

आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. असे मानले जाते, की लग्न करू इच्छिणारे जोडपे येथे दर्शनासाठी आले तर त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पोस्टाद्वारेदेखील तिरुपती बालाजीचा आशीर्वाद घेऊ शकता आणि तुमचे वैवाहिक जीवन सुरू करू शकता.

गुरुवायूर मंदिर

केरळमध्ये असलेले गुरुवायूर मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. या मंदिरात बालकृष्ण अवतारातील भगवान विष्णूची पूजा केली जाते. भक्तांसोबतच नवविवाहित जोडपेही देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. मान्यतेनुसार, या मंदिरात लग्न करणाऱ्या जोडप्याला दीर्घ आणि सुखी वैवाहिक आयुष्य लाभते. मात्र, नवविवाहित जोडप्यांना या मंदिरात प्रवेश दिला जात नाही.

त्रियुगी नारायण मंदिर

उत्तराखंडच्या त्रियुगी गावात स्थित त्रियुगी नारायण मंदिर हे भगवान शिव आणि पार्वतीचे लग्न झालेले ठिकाण मानले जाते. अशा परिस्थितीत हे मंदिर नवविवाहित जोडप्यासाठी किंवा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या जोडप्यांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक लोक या मंदिरात देवतांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी येतात. 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel