Veer Savarkar Jayanti Wishes : सावरकरांच्या जयंतीनिमित्त करा त्यांना अभिवादन, मित्रमंडळींना पाठवा 'हे' संदेश
मराठी बातम्या  /  धर्म  /  Veer Savarkar Jayanti Wishes : सावरकरांच्या जयंतीनिमित्त करा त्यांना अभिवादन, मित्रमंडळींना पाठवा 'हे' संदेश

Veer Savarkar Jayanti Wishes : सावरकरांच्या जयंतीनिमित्त करा त्यांना अभिवादन, मित्रमंडळींना पाठवा 'हे' संदेश

Updated May 28, 2024 09:59 AM IST

Swatantra Veer Savarkar jayanti wishes : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिकजवळील भगूर या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांची आज जयंती असून, यानिमित्त वाचा काही खास प्रेरणादायी विचार व संदेश

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

नाशिकमधील भगूर या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे, १८८३ रोजी झाला. त्यामुळे या दिवशी सावरकरांची जयंती साजरी केली जाते.

त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानात उपयुक्ततावाद, बुद्धिवाद, सकारात्मकतावाद, मानवतावाद, वैश्विकतावाद, व्यावहारिकता आणि वास्तववाद हे घटक होते. हिंदू महासभेचा ते प्रमुख चेहरा होते.

वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या “सागरा प्राण तळमळला”, “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”, “जयोस्तुते” “तानाजीचा पोवाडा” ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.  

फेब्रुवारी १९६६ पासून सावरकरांनी अन्न, पाणी आणि औषधे घेणे सोडले. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे निधन झाले. वीर सावरकरांची आज जयंती असून, यानिमित्ताने खास अभिवादन संदेश आणि त्यांचे प्रेरणादायी विचार, वाचा आणि पुढे पाठवा.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन संदेश

स्वातंत्र्य संग्रामचा अमर सेनानी,

स्वातंत्र्य वीर सावरकरांना

जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!!

हे मातृभूमी तुझसाठी मरण ते जनन,

तुझविण जनन ते मरण..

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

राष्ट्रभक्तीची धगधगती ज्वाळा, अखंड हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्ते,

भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि हिंदुतेजसुर्य

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रनेते, विचारवंत, तत्त्वज्ञ

स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान

कधीही वाया जात नाही..

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

कवी आणि निर्भय स्वातंत्र्यसैनिक

वीरतेचे मूर्तिमंत, भारतमातेचे सुपुत्र लेखक,

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

वीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार

धर्मग्रंथ हे ईश्वरकृत नसून मनुष्यकृत आहेत – सावरकर

यंत्राने बेकारी वाढत नाही तर विषम वाटणीमुळे वाढते - स्वातंत्र्यवीर सावरकर

नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा , मज भरतभूमिचा तारा ।।

प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी ।।

ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडून बसायचे नसते,

त्यांच्या आशिर्वादाची अपेक्षा बाळगायची असते – विनायक दामोदर सावरकर

अनेक फुले फुलती | फुलोनिया सुकोन जाती ||

कोणी त्यांची महती गणती ठेविली असे |

मात्र अमर होय ती वंशलता|

निर्वंश जिचा देशाकरिता – वीर सावरकर

आपण एकटे असलो तरी हरकत नाही.

आपल्यामागे कुणी येवो ना येवो

जे आपल्याला करावंसं वाटतं

ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे

– वीर सावरकर

Whats_app_banner