बरेच लोक रात्री झोपेत विविध प्रकारची स्वप्नं पाहतात आणि यातील काही जण तर सकाळी विसरूनही जातात. पण तुम्ही स्वप्नात जे काही पाहता त्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? स्वप्न शास्त्रानुसार तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो.
स्वप्न शास्त्रानुसार, आपल्याला पडलेल्या स्वप्नांमधून अनेक शुभ किंवा अशुभ घटनांचे इशारे मिळू शकतात. आपल्याला पडलेल्या स्वप्नांचा संबंध आपल्या भविष्याशी असतो.
स्वप्नशास्त्रात सर्व स्वप्नांचा तपशीलवार उल्लेख आहे. जर तुम्हला तुमच्या स्वप्नात सरडा दिसत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. येथे आम्ही तुम्हाला सरड्याशी संबंधित स्वप्नाबाबत सांगणार आहोत.
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात सरडा दिसणे अशुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे, की जीवनात काही समस्या उद्भवू शकतात, परंतु हे स्वप्नात कोणत्या प्रकारचे सरडे दिसले यावर देखील अवलंबून असते.
स्वप्नात लहान सरडे दिसणे अशुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या कामात अचानक व्यत्यय येऊ शकतो. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात काही समस्या उद्भवू शकतात.
तसेच, जर तुम्ही स्वप्नात सरडा घरात शिरताना पाहिले असेल तर तुम्ही काही घरगुती समस्येत अडकू शकता.
याशिवाय जर तुम्ही स्वप्नात सरडा मारत असाल तर ते शुभ लक्षण आहे. असे मानले जाते की हे स्वप्न पाहिल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात.
तसेच, जर तुम्ही तुमच्या स्वप्नात दोन सरडे आपापसात भांडताना पाहिले असतील तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला जीवनात एकाच वेळी अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)