अनेकांना सोन्याचे दागिने परिधान करण्याचा शौक असतो. पण जर तुम्हाला स्वप्नात सोनं किंवा सोन्याचे दागिने दिसत असतील तर याचाही एक विशेष अर्थ असू शकतो.
स्वप्न शास्त्रानुसार, आपल्याला पडलेल्या स्वप्नांमधून अनेक शुभ किंवा अशुभ घटनांचे इशारे मिळू शकतात. आपल्याला पडलेल्या स्वप्नांचा संबंध आपल्या भविष्याशी असतो. अशा स्थितीत सोन्याचे स्वप्न पडल्यास काय घडते? याबाबत स्वप्न शास्त्र काय सांगते ते जाणून घेऊया.
जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात सोन्याचे खूप दागिने दिसले तर याचा अर्थ असा आहे, की भविष्यात तुम्ही खूप पैसे खर्च करणार आहात. अशा परिस्थितीत, आपण विचारपूर्वक खर्च करणे आवश्यक आहे.
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात दागिन्यांची चोरी झालेली दिसले तर ते शुभ स्वप्न मानले जात नाही. अशा स्वप्नाचा अर्थ असा आहे, की व्यवसायात तुमचे नुकसान होऊ शकते किंवा तुमचा एखादा सहकारी तुमचा विश्वासघात करू शकतो. अशा परिस्थितीत, आपण सावध असणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला स्वप्नात जमिनीवर पडलेले सोने दिसले तर याचा अर्थ असा आहे, की नजीकच्या भविष्यात तुम्हाला धनाचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर स्वप्नात सोन्याचे दागिने हरवणे देखील शुभ मानले जात नाही. याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्ही भविष्यात बरेच पैसे गमावू शकता.
जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वतःला सोन्याचे दागिने खरेदी करताना पाहिले तर हे स्वप्न शुभ मानले जाते. याचा अर्थ भविष्यात तुम्हाला लाभ मिळू शकतो. त्याच वेळी, जर तुम्ही स्वप्नात एखाद्याला सोन्याचे दागिने भेट म्हणून देत असाल तर तेदेखील एक शुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवू शकता.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या