मराठी बातम्या  /  धर्म  /  Swapna Shastra : स्वप्नात शिवलिंग किंवा रुद्राक्ष दिसणे खूपच शुभ, धनलाभ होईल, नोकरीत यश मिळेल

Swapna Shastra : स्वप्नात शिवलिंग किंवा रुद्राक्ष दिसणे खूपच शुभ, धनलाभ होईल, नोकरीत यश मिळेल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 13, 2024 06:27 PM IST

Auspicious signs in dreams : जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात शिवलिंग दिसले तर ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या नोकरीतील समस्यांपासून आराम मिळू शकतो किंवा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रमोशनही मिळू शकते.

Swapna Shastra : स्वप्नात शिवलिंग किंवा रुद्राक्ष दिसणे खूपच शुभ, धनलाभ होईल, नोकरीत यश मिळेल
Swapna Shastra : स्वप्नात शिवलिंग किंवा रुद्राक्ष दिसणे खूपच शुभ, धनलाभ होईल, नोकरीत यश मिळेल (Abhisek Saha)

बरेच लोक रात्री झोपेत विविध प्रकारची स्वप्नं पाहतात आणि यातील काही जण तर सकाळी विसरूनही जातात. पण तुम्ही स्वप्नात जे काही पाहता त्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे? स्वप्न शास्त्रानुसार तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो.

तुमच्या प्रत्येक स्वप्नाचा एक विशेष अर्थ असतो, जो तुमच्या भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगू शकतो. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशी काही स्वप्ने सांगणार आहोत, जर ही स्वप्न तुम्हाला पडत असतील किंवा स्वप्नात तुम्हाला या गोष्टी दिसत असतील तर तुम्हाला धनलाभ आणि आरोग्याचे फायदे मिळू शकतात.

जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात महादेव दिसत असतील किंवा महादेवाशी संबंधित गोष्टी दिसत असतील तर ते अतिशय शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रामध्ये भगवान शिवाशी संबंधित स्वप्न पाहणे खूप शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचे स्वप्न पाहिल्याने कोणते फायदे होऊ शकतात? हे जाणून घेऊया.

शिवलिंगाचे स्वरूप

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात शिवलिंग दिसले तर ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या नोकरीतील समस्यांपासून आराम मिळू शकतो किंवा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रमोशनही मिळू शकते.

धनलाभ होऊ शकतो

बेलपत्राचा वापर शिवाच्या पूजेत केला जातो. असे मानले जाते की भगवान शिवाला बेलपत्र खूप आवडते. अशा स्थितीत जर तुम्हाला स्वप्नात बेलपत्र दिसले तर ते जीवनातील समस्यांच्या समाप्तीचे संकेत आहेत. तसेच स्वप्नात बेलपत्र दिसणे हे देखील सूचित करते की तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

स्वप्नात नंदी दिसणे

नंदी हे शिवाचे वाहन आहे. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात भगवान शिव नंदीवर स्वार झालेले दिसले तर ते खूप शुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ असा की तुमच्यावर भगवान शंकराचा आशीर्वाद आहे, ज्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे.

स्वप्नात रुद्राक्ष दिसला तर?

रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूतून झाली असे मानले जाते. अशा स्थितीत जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात रुद्राक्ष दिसला तर ते देखील शुभ चिन्ह मानले जाते. अशा स्वप्नाचा अर्थ असा आहे की त्याला दीर्घकालीन आजारापासून आराम मिळू शकेल.

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग