Swami Vivekananda Inspirational Thoughts In Marathi : आपल्या देशात असे अनेक महापुरूष होऊन गेले आहेत. ज्याचं जीवन आणि विचार आजही आपल्याला बरंच काही देऊन जातं.यापैकीच एक महापुरूष म्हणजे स्वामी विवेकानंद. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती असून, हा भारतात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता (आजचे कोलकाता) येथे बंगाली कायस्थ कुटुंबात झाला. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त कलकत्ता उच्च न्यायालयात वकील होते आणि त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्याचा जन्म त्या दिवशी ६ वाजून ३३ मिनिटे आणि ३३ सेकंदावर झाला होता.
विवेकानंदांना त्यांचे नाव आणि स्वामी ही पदवी त्यांच्या आयुष्यात खूप नंतर मिळाली. पण त्यापूर्वी त्यांचे नाव लहानपणापासून नरेंद्रनाथ होते. रामकृष्ण परमहंस यांच्याकडूनच त्यांना ईश्वर, वेदांत इत्यादी ज्ञान प्राप्त झाले आणि त्यांनी संन्यास घेतला. तेव्हापासून लोक त्यांना स्वामी विवेकानंद म्हणू लागले, त्यांना सच्चिदानंद आणि विविदिशानंद म्हणूनही ओळखले जाऊ लागले. सुरुवातीपासूनच स्वामी विवेकानंदांना ईश्वराचा शोध घेण्याची आणि समजून घेण्याची तीव्र इच्छा होती. आजही स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार युवापिढीसाठी प्रेरणास्त्रोत आहे.
पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.
जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही.
अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
दिवसातून कमीतकमी एकदा स्वतःशी नक्की बोला. नाहीतर तुम्ही तुमच्यातील एका उत्कृष्ट व्यक्तीसोबतची बैठक गमावाल.
बह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे. हे आपणच आहोत जे डोळ्यांवर हात ठेवून म्हणत आहोत की, समोर काळोख आहे.
वारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते.
स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील.
जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या.
संबंधित बातम्या