swami samarth prakat din 2024 : श्री स्वामी समर्थ महाराज यांचे महाराष्ट्रात सेवेकरी आहे. स्वामी समर्थ महाराजांचा १० एप्रिल २०२४ रोजी प्रकट दिन वा जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नव ऊर्जा, ध्येर्य, दिलासा आणि अगाध करुणा प्रदान करणारा आहे. चैत्र शुध्द द्वितियेला स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे सांगण्यात येते.
इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे, रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता.
त्यांचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे, त्यापेक्षा लाख पटीने जास्त आश्चर्यकारक त्यांचे जीवन चरित्र आहे. स्वामींनाच शरण जावून आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा साजरा करूया आणि सर्व सेवेकऱ्यांना भरभरून शुभेच्छा देऊया.
उधळा गुलाल, वाजवारे नगारे
त्रैलोक्यचे स्वामी आज धर्तीवर आले.
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा
…
निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ।
ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा
…
अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद
अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी.
"अशक्य हि सारे करितो शक्य" एक क्षणात
श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा
…
जय जय सद्गुरू स्वामी समर्था
आरती करू गुरुवर्या रे
अगाध महिमा तव चरणाचा
वर्णाया मती दे वा रे
श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा
…
भक्त वत्सल खरा तू एक होसी,
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी
श्री स्वामी समर्थ
प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
…
अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,
तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !!
श्री स्वामी समर्थ महाराज
प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
…
सन्मति, सदधृति, सतकृती सदगति प्रसाद धा हाती
श्री स्वामी समर्थ महाराज
प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
…
अजाण हतबल भ्रमीत मनिची तळमळ कशी साहू।
निरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू
श्री स्वामी समर्थ महाराज
प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
संबंधित बातम्या