वर्ष २०२४ मधील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी झाले. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. एकीकडे, सूर्यग्रहण वैज्ञानिक जगासाठी विशेष आहे, तर दुसरीकडे, ज्योतिषीय जगासाठी देखील ते विशेष आहे कारण त्याचा विविध राशींवर परिणाम होतो. यावेळी पितृ पक्षात ग्रहण होत आहे. या वर्षी दुसरे सूर्य ग्रहण ऑक्टोबरमध्ये सर्व पितृ अमावस्येला होणार आहे. सर्वपित्री अमावस्या म्हणजेच पितृपक्षाचा शेवटचा दिवस, ज्या दिवशी पितरांचे श्राद्ध केले जाते. अमावस्येला सूर्यग्रहण असल्यामुळे श्राद्ध करण्याबाबत जर तुम्हाला काही शंका असेल, तर जाणून घेऊया.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितृ तर्पण वेळेवर होईल, कारण या वेळी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी वैध ठरणार नाही, कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ ग्राह्य राहणार नाही. या दिवशी मंदिरांचे दरवाजे बंद केले जाणार नाहीत. एकंदरीत या ग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होणार नाही.
भारतीय तारखेनुसार वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी सुरू होईल आणि अर्धरात्रौ ३ वाजून १७ मिनिटांनी संपेल. म्हणजेच सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी ६ तास ४ मिनिटे असेल. या वर्षी होणारे दुसरे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल, म्हणजेच आकाशात आगीच्या कड्यासारखे दृश्य दिसेल. पण भारतात हे ग्रहण रात्री होणार आहे, त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यंदाचे ग्रहण चिली पॅसिफिक महासागर, अर्जेंटिना येथे दिसणार आहे. या ग्रहणाला रिंग ऑफ फायर असे नाव देण्यात आले असून, सुमारे १७५००० लाख लोक ते पाहू शकतील. या काळात चंद्र सूर्याचा ९३ टक्के भाग व्यापाला जाणार आहे. आकाशात सुर्याचे कंकणाकृती संपूर्ण रिंग ७ मिनिटे २५ सेकंद दिसेल.
अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होतं. चंद्र किती प्रमाणात सूर्याचा प्रकाश अडवतो यावरून ग्रहणाची खग्रास, खंडग्रास वा कंकणाकृती स्थिती सांगता येते.
या सूर्यग्रहणाला ‘रिंग ऑफ फायर’ म्हटले जाते आहे, कारण यावेळी आकाशात आपल्याला बांगडी सारखे तेजस्वी कंकणाकृती रुपात सूर्यमहाराजांचे रुप पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या