मराठी बातम्या  /  Religion  /  Surya Grahan 2023 And Chandra Grahan 2023 Date, Time, Where And How To Watch Penumbral Lunar Eclipse

Grahan 2023: एकाच महिन्यात सूर्य आणि चंद्रग्रहण; कोणत्या ग्रहणाचं लागेल सूतक? सविस्तर माहिती

Grahan
Grahan (HT Photo)
Ashwjeet Rajendra Jagtap • HT Marathi
Sep 11, 2023 02:47 PM IST

Surya And Chandra Grahan 2023: या ग्रहणांच्या सुतक काळाचा भारतीय लोकांवर परिणाम होणार की नाही? हे जाणून घेऊयात.

Surya Grahan And Chandra Grahan 2023 Date: या वर्षी आक्टोबर महिन्यात दोन ग्रहण लागणार आहेत. पहिल्या पितृ पक्षात वर्षातील दुसरे चंद्रग्रहण १४ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. यानंतर १५ दिवसांनी म्हणेजच २९ ऑक्टोबर २०२३ रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होत आहे. अशाप्रकारे एका महिन्यात दोन ग्रहणे आहेत. परंतु, हे ग्रहण भारतात दिसतील का नाही आणि त्याचा सुतक काळ काय असेल? हे अधिक महत्त्वाचे असते. यावर्षात आतापर्यंत दोन ग्रहणे लागली. परंतु, हे भारतात दिसले नाही. ज्यामुळे या ग्रहणांच्या सुतक काळाचा भारतीय लोकांवर काहीही फरक पडला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी होणारे सूर्यग्रहण रिंग ऑफ फायर असेल. म्हणजेच ग्रहण लागल्यानंतर सूर्य एका रिंगसारखा दिसेल. यावेळी सूर्याचा ९१ टक्के भाग चंद्राने झाकलेला असेल. हे ग्रहण अमेरिकेतील ८ राज्यांमध्ये पाहायला मिळेल. परंतु, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे भारतीयांवर या ग्रहणांचा कोणताही फरक पडणार नाही. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण १४ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हे ग्रहण रात्री ८ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री २ वाजून २५ मिनिटांनी समाप्त होईल.

वर्षातील दुसरे सूर्यग्रहण उत्तरी अमेरिका, कॅनाडा, मॅक्सिको, अर्जेंटीना, कोलंबिया, पेरू, क्यूबा, जमैका, हैती, ब्राझील, बहामास, अँटिग्वा, उरुग्वे, उत्तरी अमेरिका, बार्बाडोस इत्यादी ठिकाणी दिसणार आहे. या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण २९ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १ वाजून ०६ मिनिटांनी सुरू होईल आणि पहाटे २.२२ वाजता संपेल. हे ग्रहण भारतात दिसणार असून त्याचा सुतक काळ १ तास १६ मिनिटांचा असेल.