Grahan : पितृ पक्षातील पंधरवाड्यात सूर्य आणि चंद्र ग्रहण दोघंही लागणार! वाचा तारीख आणि सूतक काळ
मराठी बातम्या  /  धर्म  /  Grahan : पितृ पक्षातील पंधरवाड्यात सूर्य आणि चंद्र ग्रहण दोघंही लागणार! वाचा तारीख आणि सूतक काळ

Grahan : पितृ पक्षातील पंधरवाड्यात सूर्य आणि चंद्र ग्रहण दोघंही लागणार! वाचा तारीख आणि सूतक काळ

Published Aug 29, 2024 11:12 PM IST

Solar And Lunar Eclipse Date and Time : यावर्षी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही पितृ पक्षात होत आहेत. अमावस्येला सूर्यग्रहण आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण, सूतक वेळ आणि तारीख जाणून घ्या.

पितृपक्षात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण
पितृपक्षात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण

यावर्षी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्ही पितृ पक्षात होत आहेत. अमावस्येला सूर्यग्रहण आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण होईल. याआधी मार्च आणि एप्रिलमध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण झाले होते. होळीचे चंद्रग्रहण मार्चमध्ये होते आणि सूर्यग्रहण एप्रिलमध्ये होते. एप्रिलचे सूर्यग्रहण खूप खास होते कारण ते अमेरिकेत सर्वात जास्त काळ दिसले होते. आता सप्टेंबरमध्ये चंद्रग्रहण होणार असून ऑक्टोबरमध्ये सूर्यग्रहण होणार आहे.

चंद्रग्रहण कधी होईल?

नासाच्या वेबसाइटनुसार, १८ सप्टेंबर रोजी आंशिक चंद्रग्रहण होणार आहे. ते अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेत दिसेल. यानंतर पुढील चंद्रग्रहण १४ मार्च २०२५ रोजी होणार आहे. १७ सप्टेंबरपासून श्राद्ध सुरू होत असून हे ग्रहण रात्री होणार आहे. याशिवाय श्राद्ध पक्षाच्या अमावास्येला म्हणजेच २ ऑक्टोबरला सूर्यग्रहण होईल. मात्र, दोन्ही ग्रहण भारतात दिसणार नाहीत. त्यामुळे या दोन्ही ग्रहण भारतात वैध राहणार नाही.

आंशिक चंद्रग्रहण कधी सुरू होईल आणि ते किती काळ टिकेल.

भारतीय वेळेनुसार, चंद्रग्रहण सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी सुरु होणार आहे. हे चंद्रग्रहण सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी समाप्त होणार आहे. या ग्रहणाची एकूण वेळ ४ तास २९ मिनिटांपर्यंत असणार आहे.

वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नाही. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा सूतक काळ देखील ग्राह्य धरला जाणार नाही. हे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे.

२ ऑक्टोबरला सूर्यग्रहण

या दिवशी, चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान जाईल, परंतु चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार नाही, म्हणून हे सूर्यग्रहण अग्निच्या रिंगसारखे दिसेल. रात्रीच्या वेळी सूर्यग्रहण चमकदार रिंगसारखे दिसेल, म्हणून याला रिंग ऑफ फायर म्हणतात.

हे दुसरे सूर्यग्रहण २ आणि ३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री होणार आहे. २०२४ वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार २ ऑक्टोबर रोजी रात्री ९:१३ ते ३:१७ पर्यंत राहील. ग्रहणाचा एकूण कालावधी ६ तास ४ मिनिटे असेल. दुसऱ्या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी २ ऑक्टोबरला सकाळी ९.१३ वाजता सुरू होईल. परंतू, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या सूर्य ग्रहणाचा सूतक काळ देखील वैध राहणार नाही.

हे ग्रहण दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिकामध्ये होईल. पॅसिफिक, अटलांटिक महासागर आणि उत्तर अमेरिका देखील दृश्यमान असेल.

या ग्रहणात मंदिरांचे दरवाजे बंद होणार नाहीत. तसेच, सर्व पितृ अमावस्येला जसे श्राद्ध केले जाते तसेच परंपरेनुसार श्राद्ध विधी करता येतील. 

Whats_app_banner