Good Morning Wishes: ''भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन..'', सुंदर विचारांनी करा सकाळची सुंदर सुरुवात
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: ''भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन..'', सुंदर विचारांनी करा सकाळची सुंदर सुरुवात

Good Morning Wishes: ''भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन..'', सुंदर विचारांनी करा सकाळची सुंदर सुरुवात

Jan 25, 2025 08:40 AM IST

Good Morning Marathi Status: जीवनाचा किंवा वयाचा कोणताही पैलू असो, मानव नेहमीच सकारात्मकतेच्या शोधात असतो. रात्रीच्या एकाकीपणाला छेद देणारी सकाळची किरणे विद्यार्थ्यांना नवीन उर्जेने भरू शकतात.

Good Morning Facebook Message
Good Morning Facebook Message (pixabay)

Good Morning Marathi Message:  प्रत्येक नवीन सकाळ ही सकारात्मकतेचे आणि नवीन सुरुवातीचे लक्षण असते. जीवनाचा किंवा वयाचा कोणताही पैलू असो, मानव नेहमीच सकारात्मकतेच्या शोधात असतो. रात्रीच्या एकाकीपणाला छेद देणारी सकाळची किरणे विद्यार्थ्यांना नवीन उर्जेने भरू शकतात. दररोज एक नवीन सकाळ तुम्हाला नवीन बदल घडवून आणण्याची प्रेरणा देते. हिंदीमध्ये गुड मॉर्निंग कोट्स वाचून, तुम्ही तुमचा दिवस प्रेरणा आणि सकारात्मकतेने सुरू करू शकता. दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी, तुम्ही सकाळी लवकर चांगले विचार वाचले पाहिजेत.

गुड मॉर्निंग मराठी मेसेज-

 

हसता-खेळता घालवुया दिवसाचा,

प्रत्येक क्षण..

भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया,

प्रसन्न मन..

 

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,

नाजूक उन्हाची प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,

रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,

जी तुमच्या आवाजावरून तुमच्या

सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..

 

मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,

मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे..

शुभ सकाळ !

 

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,

फारसे मनावर घेऊ नये कारण,

या जगात असा कोणीच नाही,

ज्याला सगळे चांगले म्हणतील…

शुभ सकाळ!

 

डोळयातून वाहणारं पाणी,

कोणीतरी पाहणारं असावं..

हृदयातून येणार दु:ख,

कोणीतरी जाणणारं असावं..

शुभ सकाळ!

 

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,

मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,

आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,

ती पण तुमच्या सारखी..!

शुभ सकाळ!

उत्तर म्हणजे काय ते,

प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…

जबाबदारी म्हणजे काय हे,

त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…

शुभ सकाळ !

 

स्वतासाठी सुंदर घर करणे हे

प्रत्येकाचे एक स्वप्न असते,

पण.. एखाद्याच्या मनात घर करणे,

यापेक्षा सुंदर काहीच नसते…

सुप्रभात!

 

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर

दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.

कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.

तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.

Whats_app_banner