Somvati Amavasya 2024 In Marathi : हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. या वर्षाची शेवटची सोमवती अमावस्या ३० डिसेंबर २०२४ रोजी आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसह भगवान शंकराचीही पूजा केली जाते. या दिवशी पितरांचे स्नान आणि पिंडदानही केले जाते. असे केल्याने इच्छित फळ प्राप्त होते, असे मानले जाते. जाणून घ्या सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये.
पंचांगानुसार, यावर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ३० डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजून १ मिनिटांनी सुरू होईल, आणि ३१ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी समाप्त होईल. अशा परिस्थितीत, ३० डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाईल.
१. सोमवती अमावस्या पितरांच्या शांतीसाठी शुभ मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते.
२. सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते.
३. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र, मध, दही, चंदन आणि फळे इत्यादी अर्पण करावेत.
४. अमावस्येच्या दिवशी सूर्य देवाला जल अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने निरोगी आरोग्य आणि आर्थिक कल्याण मिळते असे मानले जाते.
५. अमावस्येच्या दिवशी गरीब व गरजूंना दान करावे. या दिवशी धान्य, उबदार कपडे आणि ब्लँकेट इत्यादींचे दान करणे शुभ मानले जाते.
१. सोमवती अमावस्येच्या दिवशी घरात वादविवाद करू नये.
२. या दिवशी कोणाचाही अपमान करू नका.
३. या दिवशी सूड बुद्धीच्या वस्तूंपासून अंतर ठेवावे.
४. सोमवती अमावस्येच्या दिवशी काळ्या वस्तूंचे दान टाळावे.
डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या