Som Pradosh Vrat: आज सोम प्रदोष व्रत! कशी कराल पूजा आणि काय आहे शुभमुहूर्त? वाचा!
Som Pradosh Vrat: भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी केलं जाणारं कार्तिक महिन्यातील सोम प्रदोष व्रत आज आहे. त्याविषयी…
हिंदू धर्म परंपरेनुसार, प्रत्येक महिन्यात दोन, म्हणजे वर्षाला २४ प्रदोष व्रत असतात. त्यापैकी एक शुक्ल पक्षात तर दुसरे कृष्ण पक्षात असते. भगवान शंकराचा वार असलेल्या सोमवारी प्रदोष व्रत केलं जातं. त्यामुळं त्यास सोम प्रदोष व्रत असं म्हणतात. कार्तिक महिन्यातील प्रदोष व्रत आज, २१ नोव्हेंबर रोजी आहे. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या व्रताच्या दिवशी शंकराची पूजा केली जाते.
ट्रेंडिंग न्यूज
प्रदोष व्रत कसे करावे?
- सकाळी आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला.
- भगवान शंकर आणि माता पार्वती देवीच्या मूर्ती एका छोट्या चौरंगावर ठेवा.
- भगवान शंकर आणि माता पार्वतीला दूध, गंगेचे पाणी, तूप, दही आणि मधाचा अभिषेक करा.
- अभिषेक झाल्यानंतर षोडशोपचार पूजा करावी.
- भगवान शंकराला बेलपत्र आणि फुले अर्पण करा.
काय होतो फायदा?
धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक व्रताचे व पूजाअर्चेचे काही लाभ असतात. तसे ते सोम प्रदोष व्रताचेही आहेत. या शंकर-पार्वतीची पूजा केल्यानं व्यक्तीच्या कुंडलीतून कालसर्प दोष मुक्त होतो आणि त्याचे सर्व रोग व दोष दूर होतात. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतात.
शुभ मुहूर्त कोणता?
आजच्या दिवशी सकाळपासून रात्री ९.०६ पर्यंत आयुष्मान योग होत आहे. या योग काळात पूजा केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि व्यक्तीला उपासनेचं दुप्पट फळ मिळतं.
शुभ वेळ कोणती?
२१ नोव्हेंबर ५.२४ मिनिटांपासून ८.०५ मिनिटांपर्यंत असेल. प्रदोष व्रताची पूजा नेहमी संध्याकाळी केली जाते.
आज सकाळी १०.०६ वाजता त्रयोदशी तिथी सुरू झाली आहे, ही तिथी मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.४८ वाजता संपेल.