Solar Eclipes: २०२५ मध्ये या दिवशी आहे सूर्यग्रहण, भारतात दिसणार आहे का?, जाणून घ्या!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Solar Eclipes: २०२५ मध्ये या दिवशी आहे सूर्यग्रहण, भारतात दिसणार आहे का?, जाणून घ्या!

Solar Eclipes: २०२५ मध्ये या दिवशी आहे सूर्यग्रहण, भारतात दिसणार आहे का?, जाणून घ्या!

Nov 06, 2024 05:20 PM IST

Solar Eclipes: येत्या २०२५ या वर्षीत सूर्यग्रहण होत असून ते कुठे दिसेल, भारतात दिसणार की नाही आणि वेळ काय असेल, हे सर्व तपशील तुम्हाला पुढील लेखात देत आहोत.

what are the Interesting Facts About Solar Eclipse 2024
what are the Interesting Facts About Solar Eclipse 2024 (Unsplash)

Solar Eclipes 2025: सन २०२४ मध्ये दोन सूर्यग्रहण झाले. त्यांतील एक सूर्यग्रहण एप्रिलमध्ये आणि दुसरे सूर्यग्रहण ऑक्टोबरमध्ये होते. आता नव्या वर्षात होणारे हे सूर्यग्रहण कधी कधी होणार याची चर्चा सुरू झाली आहे. नवीन वर्षाच्या म्हणजेच सन २०२५ च्या तिसऱ्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये एक सूर्यग्रहण होणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण कुठे दिसेल, भारतात दिसणार की नाही आणि वेळ काय असेल, हे सर्व तपशील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सन २०२५ मध्ये ग्रहण कधी होईल?

सन २०२५ मध्ये हे सूर्यग्रहण २९ मार्च रोजी होणार असून ते अर्धवट किंवा आंशिक असेल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी ०२ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल, आणि आणि संध्याकाळी ०६ वाजून १३ मिनिटांनी संपेल.

२०२५चे सूर्यग्रहण भारतात दिसणार का?

सन २०२४ प्रमाणे नवीन वर्षाचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे हे आंशिक सूर्यग्रहण पाहण्याला भारतीय नागरिक मुकणार आहेत. 

२०२५चे सूर्यग्रहण कुठे दिसणार?

सन २०२५ मध्ये दिसणारे हे ग्रहण युरोप, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक आणि आर्क्टिक महासागरात दिसणार आहे.

आंशिक सूर्यग्रहण म्हणजे काय?

आंशिक सूर्यग्रहणात, चंद्र त्याच्या सावलीत सूर्याचा फक्त एक छोटासा भाग व्यापतो. यामुळे सूर्याचा अर्धा भाग ग्रहणात असतो, तर उर्वरित भाग पृथ्वीवरून दिसत नाही. याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात.

सन २०२४ सालातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहण कंकणाकृती होते. हे सूर्यग्रहण ०२ ऑक्टोबर रोजी झाले होते. याशिवाय २०२४ ची दोन्ही सूर्यग्रहणे भारतात दिसली नाहीत.

सूर्याकडून पृथ्वीवर येणारा प्रकाश चंद्रामुळे अडतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. याला सूर्य ग्रहण स्थिती म्हणतात. चंद्र किती प्रमाणात सूर्याचा प्रकाश अडवतो यावरून ग्रहणाची स्थिती स्पष्ट होते. त्यावरूनच हे ग्रहण खग्रास आहे, खंडग्रास आहे की मग कंकणाकृती आहे हे स्पष्ट होते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner