Surya Grahan : सूर्यग्रहण भारतात नाही; पण तुम्हाला बघायचंय रिंग ऑफ फायरचे दृश्य? या एका क्लिकवर पाहू शकता
मराठी बातम्या  /  धर्म  /  Surya Grahan : सूर्यग्रहण भारतात नाही; पण तुम्हाला बघायचंय रिंग ऑफ फायरचे दृश्य? या एका क्लिकवर पाहू शकता

Surya Grahan : सूर्यग्रहण भारतात नाही; पण तुम्हाला बघायचंय रिंग ऑफ फायरचे दृश्य? या एका क्लिकवर पाहू शकता

Published Oct 02, 2024 11:28 AM IST

Surya Grahan Timing In India : आज या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, ते दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये दिसेल, जेथे रिंग ऑफ फायर सहज पाहता येईल. पण भारतातही तुम्ही हे दृश्य पाहू शकतात, कसे ते जाणून घ्या.

सूर्यग्रहण २ ऑक्टोबर २०२४ वेळ
सूर्यग्रहण २ ऑक्टोबर २०२४ वेळ

Surya Grahan 2 October 2024 : आज सर्व पितृ अमावस्येला सूर्यग्रहण होत आहे. वैदिक पंचांगानुसार या दिवशी सूर्य कन्या राशीत असेल. परंतू भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. तुम्हाला हे ग्रहण भारतात राहूनही पाहायचे असेल, तर या वेबसाइटच्या लाइव स्ट्रीमिंगवर पाहू शकता. जाणून घ्या सूर्यग्रहणाची वेळ आणि लाइव स्ट्रीमिंगची लिंक.

या लिंकवर क्लिक करून सोप्या पद्धतीने घरी बसल्या बसल्या ग्रहणाची लाइव स्ट्रीमिंग पाहू शकतात. भारतीय वेळेनुसार ग्रहण रात्री ९.१३ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.१७ वाजता संपेल. त्यामुळे त्यावेळी ग्रहण सहज पाहता येते. हे ग्रहण भारतात नाही, ते दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये दिसेल, जेथे रिंग ऑफ फायर सहज पाहता येईल. त्यामुळे या ग्रहणाचे सुतक भारतात वैध राहणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नाही. 

हे ग्रहण अशा दिवशी होत आहे जेव्हा भारतात पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे सर्वपित्री अमावस्या पितृ पंधरवडाचा शेवटचा दिवस, जर या दिवशी पित्रांचे श्राद्ध विधी केले तर त्यांना मोक्ष मिळतो आणि त्यांचा आशीर्वाद लाभतो. या दिवशी पितरांची पूजा आणि कार्य करावे, जेणेकरून कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. त्यामुळे या दिवशी दान-धर्म करणे शुभ राहील. यानंतर ग्रहण संपल्यानंतरही दान करावे.

कुठे दिसणार सूर्यग्रहण

हे ग्रहण अर्जेंटिना आणि चिलीमध्ये दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. या देशांव्यतिरिक्त अंटार्क्टिका, ब्राझील, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू, अमेरिका यासह अनेक देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे.

सुतक काळ वैध नाही

या दिवशी ग्रहणाचा सुतक काळ वैध नाही. वास्तविक, या दिवशी भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही, त्यामुळे १२ तासांपूर्वीचा सुतक कालावधी वैध राहणार नाही. त्यामुळे कुठलेही वेधादी नियम पाळू नये, या दिवशी कुठलाही संभ्रम न बाळगता सर्वपित्री अमावस्याचे श्राद्ध विधी करावे आणि पित्रांचे स्मरण करावे, जेणेकरून कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. जर सुतक काळ वैध असता तर सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी पूजा आणि शुभकार्य थांबली असती आणि मंदिरांचे दरवाजेही बंद झाले असते.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner