Grahan 2024: ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण या घटनांना फार महत्त्व आहे. ग्रहण कालावधीत अनेक नियम देखील पाळले जातात, २०२३ मध्ये २८ ऑक्टोबर ला शेवटचे चंद्र ग्रहण झाले होते. आता नवीन वर्ष प्रारंभ होईल, नवीन वर्ष २०२४ मध्ये किती ग्रहण आहे आणि ते कोणत्या तारखेला लागणार आहे जाणून घेऊ.
ग्रहांमधील बदलांना महत्त्व आहे. असे म्हटले जाते की ग्रहांच्या स्थितीत बदल झाल्यामुळे त्याचा मानवावर देखील शुभ अशुभ परिणाम होतो. वर्ष २०२४ मध्ये एकूण ४ ग्रहण लागणार आहेत. यात २ चंद्रग्रहण आणि २ सूर्यग्रहण असणार आहे. ग्रहण कालावधीत सुतक काळाला फार महत्त्व असून, या काळात कोणतेही शुभ कार्य करत नाही. ग्रहणादरम्यान मंदिरे देखील बंद ठेवण्यात येतात. जाणून घेऊ वर्ष २०२४ मध्ये लागणारे ग्रहण कधी लागणार आहे, भारतात हे ग्रहण दिसेल की नाही त्याचा सुतक काळ काय असेल.
ज्योतिषांच्या मते, २०२४ सालचे पहिले चंद्रग्रहण २५ मार्च रोजी होणार आहे. मात्र, ते भारतात दिसणार नाही. भारतात ते दिसणार नसल्यामुळे सुतक कालावधी मानला जाणार नाही. या दिवशी चंद्रग्रहण ४ तास ३६ मिनिटे राहील. चंद्रग्रहणाची वेळ सकाळी १०.२४ ते दुपारी ३.१ पर्यंत आहे.
२०२४ मधील दुसरे चंद्रग्रहण १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. ज्योतिषांच्या मते, ग्रहणकाळात राहूचा नकारात्मक प्रभाव पृथ्वीवर वाढतो. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधीही वैध ठरणार नाही. या दिवशी चंद्रग्रहण ४ तास ४ मिनिटे चालेल. चंद्रग्रहणाची वेळ सकाळी ६:१२ ते १०:१७ पर्यंत असेल.
ज्योतिषांच्या मते, २०२४ सालचे पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी होणार आहे. हे भारतात दिसणार नाही त्यामुळे सुतक वैध ठरणार नाही.
वर्ष २०२४ चे दुसरे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. सुतक भारतात दिसत नसल्यामुळे ते वैध ठरणार नाही. मात्र ग्रहणकाळात शास्त्रोक्त नियमांचे पालन करावे.
संबंधित बातम्या