गुरुवार १६ मे रोजी सीता नवमी व्रत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवव्या दिवशी देवी सीतेचा जन्म झाला. देवी सीतेची जयंती जानकी नवमी म्हणूनही ओळखली जाते. सीता नवमीच्या व्रताचा शुभ मुहूर्त, मंत्र, स्तोत्र आणि महत्व जाणून घ्या...
सीता नवमी हा दिवस माता सीतेला समर्पीत आहे. देवी सीतेचे संपूर्ण जीवन रहस्य आणि संघर्षाने भरलेले आहे. तिच्या जन्माबद्दल वेगवेगळ्या प्रकारची तथ्ये वेगवेगळ्या रामायणात वेगळे वर्णन आढळून येते. माता सीतेची आराधना केल्याने साधकाच्या जीवनातील सर्व दु:ख, संकटे दूर होतात. तसेच घरामध्ये सुख-समृद्धी नांदते.
सीता नवमी व्रत गुरुवार, १६ मे रोजी सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी सुरू होईल. त्याच वेळी, जर आपण सीता नवमीच्या शुभ मुहूर्ताबद्दल बोललो तर सीता नवमीची मध्यान्ह वेळ सकाळी ११ वाजून ४ मिनिटे ते दुपारी १ वाजून ४३ मिनिटापर्यंत असेल.
भगवान रामाला विष्णूचा अवतार आणि माता सीतेला लक्ष्मीचा अवतार मानले जाते. या दिवशी श्रीरामासह माता सीतेची पूजा केल्यास श्री हरी आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. मान्यतेनुसार, सीतामातेची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात.
सीता नवमीला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून व्रताचा संकल्प करावा व स्नान वगैरे आटोपून उपासना करावी. यानंतर, एका पाटावर लाल वस्त्र टाकून माता सीता आणि भगवान राम यांची प्रतीमा किंवा मूर्ती ठेवा. यानंतर संपूर्ण जागेवर गंगाजल शिंपडा. माता सीतेचा श्रृंगार करा. यानंतर हार, फुले, तांदूळ, धूप, दिवा, फळे, मिठाई अर्पण करा. तिळाच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि नंतर सीता मातेची आरती करा. यानंतर माता सीतेच्या मंत्रांचा १०८ वेळा जप करा आणि सीता चालिसाचा पाठ करा. संध्याकाळीही माता सीतेची पूजा करा आणि दान करा.
ॐ सीतायै नमः
ॐ जानक्यै नमः
ॐ वाल्मीकाश्रम वासिन्यै नमः
ॐ पतिव्रतायै नमः
ॐ अन्नपूर्णायै नमः
ॐ महाल्क्ष्म्यै नमः
ॐ राममोहिण्यै नमः
ॐ धिये नमः
ॐ लज्जायै नमः
ॐ सरस्वत्यै नमः
ॐ शान्त्यै नमः
ॐ पुष्ट्यै नमः
ॐ शमायै नमः
ॐ गौर्यै नमः
ॐ प्रभायै नमः
नीलनीरज-दलायतेक्षणां लक्ष्मणाग्रज-भुजावलम्बिनीम्।
शुद्धिमिद्धदहने प्रदित्सतीं भावये मनसि रामवल्लभाम्।
रामपाद-विनिवेशितेक्षणामङ्ग-कान्तिपरिभूत-हाटकाम्।
ताटकारि-परुषोक्ति-विक्लवां भावये मनसि रामवल्लभाम्।।
कुन्तलाकुल-कपोलमाननं, राहुवक्त्रग-सुधाकरद्युतिम्।
वाससा पिदधतीं हियाकुलां भावये मनसि रामवल्लभाम्।।
कायवाङ्मनसगं यदि व्यधां स्वप्नजागृतिषु राघवेतरम्।
तद्दहाङ्गमिति पावकं यतीं भावये मनसि रामवल्लभाम्।।
इन्द्ररुद्र-धनदाम्बुपालकै: सद्विमान-गणमास्थितैर्दिवि।
पुष्पवर्ष-मनुसंस्तुताङ्घ्रिकां भावये मनसि रामवल्लभाम्।।
संचयैर्दिविषदां विमानगैर्विस्मयाकुल-मनोऽभिवीक्षिताम्।
तेजसा पिदधतीं सदा दिशो भावये मनसि रामवल्लभाम्।।
।।इति जानकीस्तोत्रं सम्पूर्णम्।।