मराठी बातम्या  /  धर्म  /  महादेवाने अर्धनारीश्वराचे रूप का धारण केले? जाणून घ्या खरी कथा

महादेवाने अर्धनारीश्वराचे रूप का धारण केले? जाणून घ्या खरी कथा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 03, 2024 05:33 PM IST

Lord Mahadev : भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपात त्यांचे अर्धे शरीर पुरुषाचे आहे आणि अर्धे शरीर स्त्रीचे आहे, म्हणूनच भगवान शिवांना अर्धनारीश्वर म्हणतात.

lord shiva ardhanarishwar
lord shiva ardhanarishwar

 

पंचांगानुसार, दरवर्षी माघ वद्य चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला.

यंदा महाशिवरात्री ८ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीच्या उत्सवाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. महाशिवरात्रीला भगवान शंकराची अनेक रूपात पूजा केली जाते. शंकराच्या अनेक रुपांपैकी महादेव, भोलेबाबा आणि अर्धनारीश्वर ही रुपं सर्वात लोकप्रिय आहेत.

भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपात त्यांचे अर्धे शरीर पुरुषाचे आहे आणि अर्धे शरीर स्त्रीचे आहे, म्हणूनच भगवान शिवांना अर्धनारीश्वर म्हणतात.

महादेवाने ब्रह्मासमोर हे अर्धनारीश्वर रूप धारण केले होते. भक्त महादेव आणि शक्तीला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकराच्या अर्धनारीश्वर रूपाची विशेष पूजा करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? की महादेवाने अर्धनारीश्वराचे रूप का घेतले?

अर्धनारीश्वर रूपाचा अर्थ अर्धा नर आणि अर्धा स्त्री असा आहे. महादेवाचे अर्धनारीश्वर रूप स्त्री-पुरुष समानता दर्शवते. अर्धनारीश्वर स्वरूपाचा अर्धा भाग पुरुष व अर्धा भाग स्त्रीने वसलेला आहे. अर्धनारीश्वराचे रूप हे दर्शवते, की स्त्री आणि पुरुष दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.

महादेवाने अर्धनारीश्वराचे रूप का धारण केले?

पौराणिक कथेनुसार, ब्रह्मदेवाला विश्व निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. जेव्हा त्यांनी विश्वाची निर्मिती सुरू केली, तेव्हा त्यांना हे ज्ञान मिळाले या सृष्टीचा विस्तार होऊ शकणार नाही. ही सृष्टी काही काळानंतर नामशेष होईल आणि त्यांना पुन्हा पुन्हा विश्व निर्माण करावे लागेल. अशा स्थितीत ब्रह्माजींसमोर मोठी समस्या निर्माण झाली. 

त्याचवेळी आकाशातून आवाज आला, हे ब्रह्मदेव! लैंगिक जग तयार करा. आकाशवाणी ऐकल्यानंतर भगवान ब्रह्मदेवाने मैथुनी विश्वाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्या वेळी स्त्रीचा जन्म झाला नव्हता, म्हणून ब्रह्माजींना मैथुनी विश्व कसे निर्माण करायचे याबद्दल कोणताही निर्णय घेता आला नाही. तेव्हा ब्रह्माजींनी विचार केला की केवळ महादेवच या समस्येचे निराकरण करू शकतात.

ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून महादेवाने स्त्री-पुरुष सृष्टीसाठी अर्धनारीश्वराचे रूप धारण केले. अशा स्थितीत ब्रह्मदेवाने शिवाला एका स्त्रीच्या रूपात पाहिले, म्हणजे एका अर्ध्या भागात शक्ती आणि दुसऱ्या अर्ध्या भागात शिव. अर्धनारीश्वर स्वरूपाच्या दर्शनातून महादेवाने ब्रह्माजींना प्रजननशील प्राणी निर्माण करण्याची प्रेरणा दिली. अशाप्रकारे विश्वाच्या विस्तारासाठी भगवान शिवाने अर्धनारीश्वराचे रूप धारण केले, तेव्हापासून त्यांना अर्धनारीश्वर म्हटले जाऊ लागले.

भगवान शंकराच्या अर्धनारीश्वर स्वरूपाची पूजा केल्याने साधकाला शुभ फल प्राप्त होऊन शिव आणि पार्वती या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

WhatsApp channel

विभाग