मराठी बातम्या  /  धर्म  /  Shukrawar upay : शुक्रवारच्या दिवशी करा हे उपाय, कधीच भासणार नाही पैशाची कमतरता

Shukrawar upay : शुक्रवारच्या दिवशी करा हे उपाय, कधीच भासणार नाही पैशाची कमतरता

HT Marathi Desk HT Marathi
Nov 10, 2023 12:25 PM IST

Shukrawar Upay news in marathi : शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. या दिवशी काही विशेष गोष्टी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवता येतो.

shukrawar upay
shukrawar upay

Shukrawar Upay news in marathi : हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीला सुरुवात झाली आहे. आज धनत्रयोदशी आहे. योगायोगानं आज शुक्रवार आहे. शुक्रवार हा धनसंपदेची देवी असलेल्या लक्ष्मीला समर्पित असतो. 

ट्रेंडिंग न्यूज

एखाद्या भक्तावर देवी लक्ष्मीची कृपा असेल तर त्याला आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्यामुळं लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. शुक्रवारच्या दिवशी खास उपाय करून लक्ष्मी मातेला प्रसन्न ठेवता येतं. पाहूया काय आहेत हे उपाय…

अशा पद्धतीनं करा अष्टलक्ष्मीची पूजा

शुक्रवारी मध्यरात्री अष्टलक्ष्मीची विधिवत पूजा करा. पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्राचं पठण करा. लक्ष्मीची पूजा करताना देवीला गुलाबाचं फूल अवश्य अर्पण करा. गुलाबी किंवा पांढर्‍या रंगाची मिठाई किंवा केशर असलेली खीर देखील तुम्ही लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. लक्ष्मीची पूजा करताना पूजेत कोणताही अडथळा येऊ नये, याची काळजी घ्यावी.

Dhantrayodashi upay : धनत्रयोदशीच्या दिवशी आज घराबाहेर लावा यमाचा दिवा, घरात लक्ष्मी नांदेल!

शुक्राची स्थिती मजबूत असेल

तुमच्या कुंडलीत शुक्राचं स्थान डळमळीत असेल तर काही उपाय करता येऊ शकतात. त्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी शिवलिंगाला कच्चं दूध अर्पण करावं आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. तसंच, या दिवशी एखाद्या मुलीला पांढऱ्या रंगाची मिठाई द्यावी, तसं केल्यानं तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. 

या मंत्राचा जप करा

गुलाबी रंग हा देवी लक्ष्मीचा प्रिय मानला जातो. त्यामुळं शुक्रवारी रात्री गुलाबी रंगाचे कपडे घालून लक्ष्मीची पूजा करावी. पूजेच्या वेळी ‘ऐं हीं श्रीं अष्टलक्ष्मीयै हीं सिद्धये मम गृहे आगच्छगच्छ नमः स्वाहा’ या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा लागेल. हा उपाय केल्यानं देवी लक्ष्मीच्या कृपेनं भक्तांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.

WhatsApp channel

विभाग