प्रत्येक व्यक्तीला आपले आयुष्य आरामात जावे, असे वाटते. तसेच, जीवनात कोणत्याही समस्या येऊ नये, यासाठी प्रत्यकेजण काही ना काही उपाय करत असतो. परंतु अनेक वेळा, सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, अनेकांना त्यांच्या कामात अपयश येते, ज्यामुळे व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
अशा परिस्थितीत ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने जीवनातील अडचणी नाहीशा होता. तसेच, ज्योतिष शास्त्रात काही शुभ संकेतांबाबतही सांगितले आहे. हे संकेत आपल्याला जीवन जगत असताना वेळोवेळी मिळत असतात. ते संकेत नेमके कोणते आहेत आणि त्याचा काय अर्थ होतो, हे येथे आपण जाणून घेणार आहोत.
असे म्हटले जाते की जर तुम्हाला तुमच्या घरात किंवा कुठेही रस्त्यात मुंग्यांचा थवा दिसला तर ते खूप शुभ असते. जर मुंग्या काळ्या असतील तर ते आणखी चांगले आहे. याचा अर्थ असा आहे, की तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ मिळणार आहे. तसेच तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होणार आहे.
जर तुमच्या घराबाहेर गाई घुटमळू लागली तर ते शुभ लक्षण आहे, कारण गाय ही शुभ आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. याशिवाय घरातून बाहेर पडताना जर तुम्हाला गाय दिसली तर याचा अर्थ लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे. अशा वेळी गाईला गूळ आणि चपाती खाऊ घाला.
ज्योतिष शास्त्रानुसा,र तुमच्या घरातील तुळशीचे रोप अचानक खूप हिरवे झाले तर ते खूप शुभ लक्षण आहे. याचा अर्थ असा की तुमच्यावर देवी लक्ष्मीसह श्री हरी विष्णूचा आशीर्वाद आहे, कारण तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. तसेच, तुम्हाला आर्थिक नफा मिळणार आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या