मराठी बातम्या  /  धर्म  /  Vivah Panchami : विवाह पंचमी म्हणजे काय?, का साजरी केली जाते विवाह पंचमी?, कोणते आहेत शुभ मुहूर्त

Vivah Panchami : विवाह पंचमी म्हणजे काय?, का साजरी केली जाते विवाह पंचमी?, कोणते आहेत शुभ मुहूर्त

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Nov 16, 2022 12:19 PM IST

Shubh Muhurta Of Vivah Panchami : विवाहपंचमी म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग विवाह पंचमी म्हणजे काय आणि ती का साजरी केली जाते पाहूया.

का साजरी केली जाते विवाह पंचमी
का साजरी केली जाते विवाह पंचमी (हिंदुस्तान टाइम्स)

भारतीय इतिहासात 'राम' या शब्दाला अनन्यसाधारण वलय प्राप्त झालं आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम घराघरात पूजला जातो. अयोध्येत मात्र सध्या विवाह पंचमीची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. विवाहपंचमी म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग विवाह पंचमी म्हणजे काय आणि ती का साजरी केली जाते पाहूया.

हिंदू कॅलेंडरनुसार विवाह पंचमी हा सण मार्गर्शिष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. यासोबतच तुलसीदासजींनी रामचरितमानस पूर्णपणे लिहिलं होतं. या दिवशी भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह होणे शुभ मानले जाते. असे केल्याने रोग, दोष आणि भय यापासून मुक्ती मिळते.

यंदा कोणते आहेत विवाह पंचमीचे मुहूर्त कोणती आहे शुभ वेळ घ्या जाणून

विवाह पंचमी २०२२

विवाह पंचमी तारीख - २८ नोव्हेंबर, सोमवार

पंचमी तिथीची सुरुवात - २७ नोव्हेंबर दुपारी ५ वाजता

पंचमी तिथी समाप्त - २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून ३५ मिनिटं

२८ नोव्हेंबर रोजी उदया तिथी असल्याने त्याच दिवशी विवाह पंचमीचा सण साजरा केला जाणार आहे.

विवाह पंचमी २०२२ चे शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त - सकाळी ११ वाजून ४८ मिनिटं ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत

सर्वार्थ सिद्धी योग - २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून २९ मिनिटं ते संध्याकाळी ६ वाजून ५४ मिनिटांपर्यंत

रवि योग - २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून २९ मिनिटं

काय आहे विवाह पंचमीचं महत्व

माता सीता आणि भगवान श्री राम यांचा विवाह पंचमीच्या दिवशी झाला होता. म्हणूनच या दिवशी माता सीता आणि श्री राम यांची पूजा केली जाते. या दिवशी पूजाविधी केल्याने वैवाहिक जीवनात आनंदच प्राप्त होतो, असे मानले जाते.

यामुळे वैवाहिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीपासून सुटका मिळते. खासकरुन अयोध्येत ही विवाह पंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

 

WhatsApp channel

विभाग