मराठी बातम्या  /  धर्म  /  Vijaya Ekadashi 2023 : विजया एकादशीचे शुभ मुहूर्त कोणते?, कशी कराल पूजा?

Vijaya Ekadashi 2023 : विजया एकादशीचे शुभ मुहूर्त कोणते?, कशी कराल पूजा?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Feb 15, 2023 07:00 AM IST

Shubh Muhurta Of Vijaya Ekadashi : प्रभू श्री रामांनी लंकेवर स्वारी करण्यापूर्वी विजया एकादशीचे हे व्रत केलं होतं. त्यानंतर श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला होता इतकं विजया एकादशीचं महत्व आहे.

विजया एकादशी
विजया एकादशी (हिंदुस्तान टाइम्स)

Shubh Muhurta Of Vijaya Ekadashi

नावाप्रमामेच विजय मिळवून देणारी एकादशी म्हणजेच विजया एकादशी. प्रभू श्री रामांनी लंकेवर स्वारी करण्यापूर्वी विजया एकादशीचे हे व्रत केलं होतं. त्यानंतर श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला होता इतकं विजया एकादशीचं महत्व आहे. उद्या म्हणजेच १६ फेब्रुवारी रोजी विजया एकादशीचं व्रत ठेवलं जाईल. मात्र त्याचे शुभ मुहूर्त कोणते ते जाणून घेऊया.

विजया एकादशीचे शुभ मुहूर्त

विजया एकादशी १६ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३२ वाजता सुरू होईल, ती १७ फेब्रुवारीला दुपारी २.४९ वाजता संपेल. दोन्ही दिवशी उदया तिथीची स्थापना होत आहे. अशा परिस्थितीत यंदा विजया एकादशी १६ आणि १७ फेब्रुवारीला साजरी होणार आहे. मात्र, एकीकडे एकादशी साधारणपणे १६ फेब्रुवारीला असेल, तर दुसरीकडे वैष्णव पंथाचे लोक १७ फेब्रुवारीला उपवास ठेवतील.

कशी कराल विजया एकादशीची पूजा

माघ महिन्यात भगवान विष्णूची पूजा करण्याची विशेष प्रथा आहे, तर एकादशीच्या दिवशीही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे. या कारणास्तव विजया एकादशीच्या दिवशी दोघांची एकत्र पूजा करा.

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासमोर लाल वस्त्र पसरून त्यावर स्वस्तिक बनवा आणि स्वस्तिकावर अक्षता आणि फुले ठेवा. यानंतर माता आणि श्रीविष्णू यांना हार घाला आणि नंतर त्यांचे ध्यान करा.

ध्यानानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून घ्या. लक्षात ठेवा की प्रसादाने उपवास कधीच मोडत नाही, त्यामुळे तुम्ही उपवासाच्या वेळीही प्रसादाचे सेवन करू शकता.

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करा आणि दिवसभर त्यांच्या भजन आणि कीर्तनात स्वतःला समर्पित करा. संध्याकाळी, श्री हरी आणि माता लक्ष्मीची आरती करा आणि आपली इच्छा देवाकडे मागा.

विजया एकादशीला काय टाळाल

जर तुम्ही उपवास करत असाल तर सात्विक अन्नच खावे. तांदूळ किंवा खीर खाणे टाळा. जेव्हा तुम्ही त्याचे पूर्ण पालन करू शकाल तेव्हाच उपवास ठेवा. राग टाळा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तसेच आपले आचरण शुद्ध ठेवा.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

 

WhatsApp channel

विभाग