मराठी बातम्या  /  धर्म  /  Jaya ekadashi 2023 : हे आहेत जया एकादशीचे शुभ मुहूर्त, अशी आहे पूजेची पद्धत

Jaya ekadashi 2023 : हे आहेत जया एकादशीचे शुभ मुहूर्त, अशी आहे पूजेची पद्धत

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Feb 01, 2023 07:02 AM IST

Shubh Muhurta Of Jaya ekadashi 2023 : जया एकादशीचं व्रत अक्षय टिकतं आणि त्याचे खूप चांगले परिणाम मिळतात असंही शास्त्र सांगतं. आज जया एकादशीच्या निमित्ताने शुभ मुहूर्त कोणते आहेत.

जया एकादशीचे मुहूर्त
जया एकादशीचे मुहूर्त (हिंदुस्तान टाइम्स)

Shubh Muhurta Of Jaya ekadashi 2023

आज १ फेब्रुवारी अर्थात २०२३ च्या दुसऱ्या इंग्रजी महिन्याची सुरुवात. आजचा दिवस एकादशीचा दिवस आहे. आज जया एकादशी आहे. आज फक्त फलाहार करावा आणि भगवान श्रीविष्णूचं नामस्मरण करावं असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज केलेलं जया एकादशीचं व्रत अक्षय टिकतं आणि त्याचे खूप चांगले परिणाम मिळतात असंही शास्त्र सांगतं. आज जया एकादशीच्या निमित्ताने शुभ मुहूर्त कोणते आहेत. चला पाहूया.

जया एकादशीचे शुभ मुहूर्त 

हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ३१ जानेवारी २०२३ रोजी रात्री ११ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होईल आणि १ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २ वाजून ०१ मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार जया एकादशीचे व्रत १ फेब्रुवारीला म्हणजेच आज पाळले जाणार आहे. जया एकादशीच्या दिवशी सकाळी ७.१० वाजता पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि दिवसभर सुरू राहील. या व्रताचं पारायण २ फेब्रुवारी २०२३ रोजी केले जाणार आहे. पारायणाचा शुभ मुहूर्त सकाळी ७ वाजून ०९ मिनिटं ते ९ वाजून १९ मिनिटांपर्यंत असेल.

कशी करावी जया एकादशीची पूजा

जया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करून हातात पाणी घेऊन उपवासाचा संकल्प करावा. यानंतर गंगेचे पाणी शिंपडून देवघर शुद्ध करा आणि भगवान विष्णूची पूजा करा. एकादशीला भगवान विष्णूची पूजा करताना त्यांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. हळदीचा टिळा शुद्ध तुपात मिसळून लावावा. यानंतर तुपाचा दिवा लावून मिठाई अर्पण करावी. एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावावा. या दिवशी फक्त फलाहार करावा ाणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करावं

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

विभाग