Shubh Muhurt: नोव्हेंबर महिन्यात घर, मालमत्ता, वाहन खरेदी, गृह प्रवेश करणार आहात? असे आहेत शुभ मुहूर्त, जाणून घ्या!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Shubh Muhurt: नोव्हेंबर महिन्यात घर, मालमत्ता, वाहन खरेदी, गृह प्रवेश करणार आहात? असे आहेत शुभ मुहूर्त, जाणून घ्या!

Shubh Muhurt: नोव्हेंबर महिन्यात घर, मालमत्ता, वाहन खरेदी, गृह प्रवेश करणार आहात? असे आहेत शुभ मुहूर्त, जाणून घ्या!

Nov 05, 2024 03:58 PM IST

या महिन्यात, अर्थात नोव्हेंबर २०२४ मध्ये मालमत्ता खरेदीसाठी शुभ मुहूर्त आणि खरेदी करताना काही वास्तू नियम आहेत. जाणून घेऊयात, काय आहेत हे नियम...

नोव्हेंबर महिन्यात घर, मालमत्ता, वाहन खरेदी, गृह प्रवेश करणार आहात? पाहा, शुभ मुहूर्त!
नोव्हेंबर महिन्यात घर, मालमत्ता, वाहन खरेदी, गृह प्रवेश करणार आहात? पाहा, शुभ मुहूर्त!

Property Purchasing Shubh Muhurt: तुम्ही नोव्हेंबर महिन्यात घर, मालमत्ता, वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर असा विचार करत असाल तर तुम्ही शुभ मुहूर्त जाणून घेणे आवश्यक आहे. पाहू या, नोव्हेंबर २०२४ मध्ये मालमत्ता खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते आहेत ते. मालमत्ता खरेदी करताना वास्तू नियम लक्षात ठेवणेही आवश्यक आहे.

नोव्हेंबर २०२४ मध्ये मालमत्ता खरेदीसाठी शुभ मुहूर्त

वाहन खरेदीसाठी

वाहन खरेदीसाठी ०१ नोव्हेंबर, १३ नोव्हेंबर, १८ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर, २१ नोव्हेंबर, २५ नोव्हेंबर आणि २८ नोव्हेंबर हे ७ दिवस शुभ दिवस आहेत. यांपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही वाहन खरेदी करू शकता.

मालमत्ता किंवा घर इत्यादी खरेदीसाठी

तुम्हाला जर मालमत्ता, किंवा घर खरेदी करायचे असेल तर त्यासाठी ०२ नोव्हेंबर, ०६ नोव्हेंबर, ०७ नोव्हेंबर, ११ नोव्हेंबर, १९ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर आणि ३० नोव्हेंबर हे दिवस खूप शुभ असतील.

गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त

जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात गृह प्रवेश करायचा ठरवले असेल तर त्यासाठी एकूण ५ दिवस शुभ आहेत. या शुभ दिवसांमध्ये ०८ नोव्हेंबर, १३ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर, १८ नोव्हेंबर आणि २५ नोव्हेंबर या शुभ दिवसांचा समावेश आहे.

नामकरणासाठी शुभ मुहूर्त

वैदिक दिनदर्शिकेनुसार ०१ नोव्हेंबर, ०३ नोव्हेंबर, ०७ नोव्हेंबर, ०८ नोव्हेंबर, १३ नोव्हेंबर, १७ नोव्हेंबर, १८ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर, २१ नोव्हेंबर, २५ नोव्हेंबर, २७ नोव्हेंबर आणि २८ नोव्हेंबर हे सर्वोत्तम दिवस आहेत.

अन्नप्राशन मुहूर्त

नोव्हेंबर महिन्यात अन्नप्राशन करण्यासाठी ०४ नोव्हेंबर, ०८ नोव्हेंबर, ११ नोव्हेंबर, १३ नोव्हेंबर, १४ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर, २५ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर हे दिवस चांगले आहेत.

कर्णवेध संस्कार मुहूर्त

नोव्हेंबर महिन्यात कर्णवेध संस्कार करायचा असल्यास त्यासाठी ०३ नोव्हेंबर, ०४ नोव्हेंबर, ०८ नोव्हेंबर, ०९ नोव्हेंबर, १३ नोव्हेंबर, १४ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर, २१ नोव्हेंबर आणि २७ नोव्हेंबर हे ९ दिवस शुभ आहेत.

महत्त्वाच्या गोष्टी

> कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहिला जावा.

> सूर्योदयाचा प्रकाश पोहोचेल असे घर खरेदी करा.

> पूर्व आणि उत्तरेकडे मुख असलेले घर नेहमीच फायदेशीर असते.

> चुकूनही दक्षिणाभिमुख घर खरेदी करू नये.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner