मराठी बातम्या  /  धर्म  /  विवाह ते गृहप्रवेश… मार्च महिन्यातील सगळ्या शुभ मुहूर्तांची यादी येथे पाहा; लग्नासाठी १० दिवस आहेत मुहूर्त

विवाह ते गृहप्रवेश… मार्च महिन्यातील सगळ्या शुभ मुहूर्तांची यादी येथे पाहा; लग्नासाठी १० दिवस आहेत मुहूर्त

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 27, 2024 03:36 PM IST

March 2024 Shubh Muhurat : मार्च महिना सुरू होण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य शुभ मुहूर्त पाहूनच केले जाते.

shubh muhurt in march 2024
shubh muhurt in march 2024

Shubh Muhurat In March 2024 : हिंदू मान्यतेनुसार, कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाळणे आवश्यक आहे. कारण असे मानले जाते की शुभकाळात केलेल्या कामांमुळे देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो, तसेच ते कार्य यशस्वी होते. अशा स्थितीत, लग्न, नामकरण समारंभ आणि गृहप्रवेश इत्यादी कार्यांसाठी मार्च महिन्यात कोणते शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घेऊया.

मार्च २०२४ मधील शुभ मुहूर्तांची यादी

सर्वार्थ सिद्धी योग

सर्वार्थ सिद्धी योग हा ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ योग मानला जातो. अशा स्थितीत मार्च महिन्यात ०८, १०, १२, १६, २४, २९ आणि ३१ मार्च रोजी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे.

अमृत ​​सिद्धी योग

अमृत ​​सिद्धी योग ज्योतिष शास्त्रातही खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. १२ आणि १६ मार्च रोजी अमृत सिद्धी योग तयार होत आहे.

वाहन व मालमत्ता खरेदीसाठी शुभ काळ

०१, ०८, १५, १७, २०, २५, २७, २८ आणि २९ मार्च हे वाहन खरेदीसाठी उत्तम दिवस असणार आहेत.

मालमत्ता किंवा घर इत्यादी खरेदीसाठी - ०१, ०५, ०६, १०, १९,२९ आणि ३० मार्च शुभ दिवस आहेत.

लग्न वगैरेसाठी शुभ मुहूर्त

मार्च महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त: ०१,०२, ०३, ०४, ०५, ०६,०७, १०, ११ आणि १२ मार्च हे लग्नासाठी दिवस असणार आहेत.

गृहप्रवेश - ०२,०६, ११, १६, २७, २९ आणि ३० मार्च हे गृहप्रवेश कार्यक्रमासाठी चांगले दिवस जाणार आहेत.

नामकरणासाठी शुभ मुहूर्त - ०१, ०३, ०६, ०७, ०८, ११, १५, १७, २०, २४, २५, २७, २८ आणि २९ मार्च हे नामकरण विधीसाठी उत्तम दिवस असणार आहेत.

अन्नप्राशनासाठी शुभ मुहूर्त - ०८, ११, २७ मार्च

कर्णवेदासाठी शुभ मुहूर्त - ०३, ०७, ०८, २५, २७, ३० मार्च शुभ आहेत.

अभ्यास सुरू करण्यासाठी शुभ मुहूर्त - ०६,२०, २१, २७ रोजी शुभ मुहूर्त तयार होत आहे.

जनेयू मुहूर्त - मार्च महिन्यात जनेयू संस्कारासाठी २७, २९ मार्च हे शुभ मुहूर्त आहेत.

मुंडन मुहूर्त - ०८, २०,२७ आणि २८ मार्च हे मुंडन संस्कारासाठी उत्तम दिवस असतील.

 

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग